शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दाऊद आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यापारातही सक्रीय

By admin | Updated: August 30, 2015 17:53 IST

रिअल इस्टेट, तस्करी, हवाला, बेटिंग, बनावट नोटा अशा विविध उद्योगांमध्ये सक्रीय असलेल्या दाऊद इब्राहिमने आता त्याचा मोर्चा आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यवसायाकडे वळवला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ३० - रिअल इस्टेट, तस्करी, हवाला, बेटिंग, बनावट नोटा अशा विविध उद्योगांमध्ये सक्रीय असलेल्या दाऊद इब्राहिमने आता त्याचा मोर्चा आफ्रिकेतील रक्तरंजित हिरे व्यवसायाकडे वळवला आहे. अजित डोवल यांच्या आदेशानंतर गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या उद्योगधंद्यांची माहिती घ्यायला सुरुवात केली असून यात दाऊद आफ्रिकेतील हिरे व्यवसायात सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. 
आफ्रिका खंडातील काँगो, सिएरा लिओन, अंगोला यासारख्या देशांमध्ये हि-यांचा खाणी असून या हि-यांची दहशतवादी संघटांनकडून विक्री केली जाते. या हिरेविक्रीतून मिळालेल्या अमाप पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जातो. त्यामुळे या हि-याला ब्लड डायमंड म्हणजेच रक्तरंजित हिरे म्हणून ओळखले जाते. या हि-यांच्या खरेदी विक्रीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने बंदी टाकली आहे.  या रक्तरंजित हि-यांच्या व्यापारात आता दाऊद इब्राहीमने उडी घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार झिम्बाब्वे व केनिया येथे दाऊदचे नेटवर्क असून याच माध्यमातून हा व्यापार केला जात असल्याचे समजते. या हि-यांची दुबईत तस्करी जात असल्याचे  समजते. आफ्रिकेत रेहमत नावाचा दाऊदचा निकटवर्तीय असून तोच हा व्यापार सांभाळत असल्याचे वृत्त आहे. रेहमत आफ्रिकेतील महिला व तरुणांचा हिरे तस्करीत कुरियर म्हणून वापरतो. दुबईत दाऊदच्या अल नूर डायमंड या कंपनीच्या माध्यमातून या हि-यांची विक्री होते. दुबईतील एका फेरीत सुमारे ५ ते १० लाख डॉलर्स किंमतीच्या हि-यांची तस्करी होती. यात एका आफ्रिकन कुरियला सुमारे १० हजार डॉलर्सचा मोबदला दिला जातो. दाऊदच्या या हिरेव्यापाराविषयी आणखी माहिती जमा केली जात असून दाऊदचे आणखी उद्योगही लवकरच उघड होतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.