शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘हितसंबंधांच्या तिढ्या’वरून दवेंंची घटनापीठातून माघार

By admin | Updated: April 16, 2015 01:45 IST

‘हितसंबंधांच्या तिढ्या’च्या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यात आल्याने या घटनापीठातून बुधवारी माघार घेतली.

नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी गेली दोन दशके लागू असलेली ‘कॉलेजियम पद्धत’ मोडीत काढून त्याऐवजी यासाठी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग नेमण्याच्या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या घटनापीठाचे प्रमुख न्या. अनिल आर. दवे यांनी, ही सुनावणी करण्यास ‘हितसंबंधांच्या तिढ्या’च्या मुद्द्यावरून आक्षेप घेण्यात आल्याने या घटनापीठातून बुधवारी माघार घेतली. त्यामुळे या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांना आता नवे घटनापीठ स्थापन करावे लागेल.संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला व राष्ट्रपतींची संमती मिळालेला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा केंद्राने अधिसूचना काढून १३ एप्रिलपासून लागू केला. मात्र त्याआधीच या प्रस्तावित कायद्याच्या घटनात्मक वैधतेस आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या होत्या. ७ एप्रिल रोजी तीन सदस्यीय खंडपीठाने या याचिका घटनापीठाने ऐकाव्यात, असे सुचविले. त्यानुसार लगेच व सरकारने कायदा लागू करण्याची अधिसूचना काढण्यापूर्वी सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तू यांनी या सुनावणीसाठी न्या. दवे, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. मदन लोकूर व न्या. कुरियन जोसेफ यांचे घटनापीठ स्थापन केले.ज्येष्ठ वकील फली नरिमन यांनी न्या. दवे यांनी ही सुनावणी करण्यास आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे असे होते की, नवा कायदा १३ एप्रिलपासून लागू झाला आहे व त्यानुसार न्या. दवे हे आता आयोगाचे पदसिद्ध सदस्य आहेत. त्यामुळे एकीकडे आयोगाचे सदस्य राहायचे व दुसरीकडे त्याची स्थापना करणाऱ्या कायद्यास आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायाधीश म्हणून सुनावणी करायची हा दवेंच्या दृष्टीने हितसंबंधाचा तिढा (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट) ठरेल. त्यामुळे न्या. दवे यांनी, आपण आयोगाच्या कामकाजात भाग घेणार नाही, असे सुरुवातीसच सांगून टाकावे, असे नरिमन म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)न्या. दवे हे सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश व न्या. टी. एस. ठाकूर यांच्यानंतर ज्येष्ठताक्रमाने तिसरे न्यायाधीश आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ स्थापन केले.घटनापीठाची रचना झाली तेव्हा न्यायिक नियुक्ती आयोगाचा कायदा अमलात आलेला नव्हता.१३ एप्रिल रोजी हा कायदा लागू झाल्यावर न्या. दवे या आयोगाचे आपोआप पदसिद्ध सदस्य झाले. याचे कारण असे की, सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे त्यांच्यानंतरचे दोन ज्येष्ठतम न्यायाधीश या आयोगाचे सदस्य असतील, अशी या कायद्यात तरतूद आहे.खरे तर ७ एप्रिल रोजी तीनसदस्यीय खंडपीठाने या कायद्याला स्थगिती न देता सुनावणी घटनापीठापुढे करावी, असे निर्देश दिले तेव्हाच हा कायदा लागू करण्याचा सरकारचा मार्ग मोकळा झाला होता. तसे झाले तर आपण स्वत: व न्या. ठाकूर आणि न्या. दवे आपोआप आयोगाचे सदस्य होऊ, हे घटनापीठाची रचना करताना सरन्यायाधीशांनी विचारात घेतले असते तर कदाचित ही विचित्र परिस्थिती उद््भवलीही नसती.