शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ भाज्यातून तयार केले विविध पदार्थ शून्य कचरा नियोजन: कच्छी जैन मंडळाचा उपक्रम

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.

सोलापूर : कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी टाकाऊ भाजीपाल्यातून अनेक चविष्ट पदार्थ बनविण्याचा र्शी सर्वोदय कच्छी मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी कौतुक केले आहे.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत र्शी सर्वोदय कच्छी जैन मंडळाने स्मार्ट वॉर्ड तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानंतर कचर्‍याची समस्या सोडविण्यासाठी शून्य कचरा नियोजन ही संकल्पना मांडली आहे. स्वयंपाक घरात आणलेल्या भाज्यांचा वापर झाल्यानंतर देठे, साली व इतर भाग काढून कचर्‍यात टाकले जातात. पण भाज्यांचे देठ व सालीपासून अनेक चविष्ठ पदार्थ बनविता येतात. असा प्रयोग कच्छी जैन मंडळाचे चंदुभाई देढीया, उषाबेन शहा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. याचे प्रात्यक्षिक आयुक्त काळम-पाटील यांना दाखविण्यात आले. भोपळ्याच्या सालीपासून चटणी, कलिंगडाचा पांढरा गर व फ्लॉवरचे पान, केळीच्या सालापासून भाजी व थालीपीठ, पालकाच्या देठापासून पेंडपाला, कोथिंबीरच्या देठापासून मसाला, दोडक्याच्या सालीपासून शिरा व चटणी, पिळलेल्या लिंबाच्या सालीचे लोणचे, डाळिंबाची साल वाळवून औषध, बटाट्याच्या सालीची पावडर असे अनेक रुचकर पदार्थ तयार केले.
बाजारातून आणलेल्या भाज्या निवडल्यानंतर टाकलेले देठ व सालीपासून निम्मा ओला कचरा निर्माण होतो. हा कचरा वेळेत उचलला गेला नाही तर कुजून दुर्गंधी सुटते. त्यामुळे कचर्‍याची समस्या निर्माण होते. पण भाज्या नीट करताना देठ व सालीचे नियोजन केले तर भाज्यांचा खर्च वाचेल याशिवाय कचर्‍याची समस्या निर्माण होणार नाही असे उषाबेन शहा यांनी सांगितले. महिला मंडळे, बचत गट, स्वयंसेवी संस्थाद्वारे ही संकल्पना घरोघरी पोहोचवा असे आदेश महापालिका आयुक्त काळम?पाटील यांनी स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक दत्तात्रय चौघुले यांना दिले. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपायुक्त र्शीकांत मायकलवार, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके आदी उपस्थित होते.