शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बंद मोटारीत गुदमरून जुळ्या बहिणींचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 03:47 IST

घराशेजारच्या मोकळ्या शेतजमिनीत उभ्या करून ठेवलेल्या नादुरुस्त मोटारीत खेळण्यासाठी गेल्या असता मोटारीचे दरवाजे चुकून ‘आॅटो लॉक’ होऊन हर्षिता

गुरूग्राम : घराशेजारच्या मोकळ्या शेतजमिनीत उभ्या करून ठेवलेल्या नादुरुस्त मोटारीत खेळण्यासाठी गेल्या असता मोटारीचे दरवाजे चुकून ‘आॅटो लॉक’ होऊन हर्षिता आणि हर्षा या साडेपाच वर्षांच्या जुळ्या बहिणींचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना येथून १६ किमी अंतरावर असलेल्या जमालपूर गावात घडली.हर्षिता, हर्षा, त्यांची आई कीर्ती व त्यांचा अडीच वर्षांचा धाकटा भाऊ असे सर्व जण ९ जून रोजी जमालपूर येथे त्यांच्या आजोळी आल्या होत्या. त्यांच्या अजोबांच्या घरापासून जवळच मोकळ्या शेतजमिनीत एक मोटार उभी करून ठेवलेली होती. हर्षिता व हर्षा खेळत-खेळत मोटारीजवळ गेल्या व दरवाजा उघडून आत चढल्या. मोटारीचे दरवाजे लागले व ‘आॅटो लॉक’ झाले. मोटार उघड्यावर रणरणत्या उन्हात उभी होती. काही वेळाने या दोघी मोटारीत गुदमरल्या.मुली कुठे गेल्या याचा शोध घेत आजोळच्या घरचे लोक आले, तेव्हा त्यांना मोटारीच्या पुढच्या सीटवर हर्षिता व मागच्या सीटवर हर्षा बेशुद्धावस्थेत पडलेल्या दिसल्या. जुनी, नादुरुस्त मोटार कित्येक महिने तेथे गंजत पडलेली होती. त्यामुळे ‘आॅटो लॉक’ झालेले तिचे दरवाजे व काचा बाहेरून उघडेनात. शेवटी काचा फोडून दोघींना बाहेर काढले व इस्पितळात नेले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हर्षिता व हर्षाचे वडील गोविंद कुमार भारतीय लष्करात जवान आहेत व त्यांचे मेरठला पोस्टिंग आहे. त्यांनी मुलांना व पत्नीला आजोळी पाठविले होते व बुधवारी तेही घरी येणार होते. मेरठमध्ये त्यांनी दोन्ही मुलींना इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता व शाळा सुरू होणार असल्याने ते त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते. (वृत्तसंस्था)हर्षिता व हर्षा या आमच्या कुटुंबाचा जीव की प्राण होत्या. जुळ्या असल्याने दोघी नेहमी एकत्र खेळत असत. त्या हे जगही असे एकत्रपणे सोडून जातील, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. गुरुवारी त्यांना पहिल्या दिवशी शाळेत जायचे होते. पण त्याआधीच त्या आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.- कंवर सिंग, हर्षिता व हर्षाचे आजोबा