शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतिवापरामुळे येऊ शकतं वृद्धत्व !

By admin | Updated: June 27, 2016 07:10 IST

गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 27 - गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं माणसाच्या आयुष्यातील महत्त्व गरजेपेक्षा जास्त वाढलं आहे. अनेकदा मोबाईल, लॅपटॉपच्या आहारी गेलेला माणूस भूक-तहानही विसरतो, अशा घटनाही समोर आल्या आहेत. मात्र या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा अतिप्रमाणात वापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मोबाईल फोन आणि टॅबलेटसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटचा प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत असून, वृद्धत्व लवकर येण्याची चिन्हे असतात, असा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.  
आरोग्यतज्ज्ञांच्या मते,  इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे त्वचा सैल पडणे, जबडा मोठा होणे, चेह-यावर सुरकुत्या पडणे,  मानेवर चरबी वाढणे, चेह-याच्या सौंदर्यावर विपरीत परिमाण होण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटर, टॅबलेट, स्मार्टफोन सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर तासनतास बसून राहिल्यास डोकं दुखणं, चेह-यावर सुरकुत्या पडणे आणि खांद्यांचं दुखणंही उद्भवत असल्याची माहिती फोर्टिस हॉस्पिटलचे कॉस्मेटिक सर्जन विनोद विज यांनी दिली आहे. 
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) या संस्थेनं काही दिवसांपूर्वीच केलेल्या सर्वेक्षणातून देशातले 371 लाख लोक मोबाईल आणि इंटरनेटचा अधिक प्रमाणात वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातले 40 टक्के वापरकर्ते हे 19-30 वयातील तरुण आहेत. इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या अतिवापरामुळे तरुणांमध्ये नकारात्मकता वाढत असून, त्याचा त्वचा आणि मानेच्या हाडांवर विपरीत परिणाम होत असल्याचं सीनियर कॉस्मेटिक सर्जन मोहन थॉमस यांनी म्हटलं आहे.