वेल्लोर (तामिळनाडू) : वेल्लोरच्या राणीपेटमध्ये मंगळवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात भेलच्या निवासी परिसराजवळ एका बॅगेत काही तार आणि एक भ्रमणध्वनी आढळून आल्याने तारांबळ उडाली.बॉम्ब निकामी करणारे पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस बॅगमधील सामान तपासत आहेत. चेन्नईत गेल्या १ मे रोजी रेल्वेस्थानकावर काझीरंगा एक्स्प्रेमध्ये दुहेरी बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये एका महिलेचा जीव गेला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी कुड्डलोर जिल्ह्यात बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पाच जण जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर या घटनेचा तपास सुरू आहे. (वृत्तसंस्था)
भेल परिसरात संशयास्पद बॅग आढळल्याने तारांबळ
By admin | Updated: May 7, 2014 02:34 IST