शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

डेंजरस इश्क! प्रेमप्रकरणातून जाताहेत दहशतवादापेक्षा सहा पट बळी

By admin | Updated: April 2, 2017 08:14 IST

देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 2 -  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात एकमेकांवर प्रेमकरणाऱ्या आर्ची आणि परशाचा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2001 ते 2015 या 15 वर्षांमध्ये देशात प्रेमप्रकरणांमधून 38 हजार 585 जणांचा बळी घेण्यात आला आहे. सरासरी आकडेवारीनुसार देशात प्रेमप्रकरणातून दररोज 7 हत्या, 14 आत्महत्या आणि 47 अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. 
सातत्याने दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतामध्ये  दरवर्षी शेकडो नागरिक दहशतवादी कारवायांत मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकणातून होणारे मृत्यूचे प्रमाण सहापट अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. या वृतानुसार 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या काळात प्रेमप्रकरणातून 38 हजार 585 बळी घेण्यात आले आहेत.  तर याच काळात प्रेमप्रकरणातील अपयश आणि यासंदर्भातील अन्य कारणांमुळे 79 हजार 189 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.  मात्र या  15 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजार जणांना मरण आले होते. 
आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व राज्यात गेल्या 15 वर्षांत 3 हजार हून अधिक हत्या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. तसेच देशभरात या काळात 2.6 लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. यात महिलांचे अपहरण हे मुख्यत्वेकरून विवाहाच्या उद्देशाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.  तर प्रेमप्रकणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. तेथे 15 वर्षात 15 हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.