शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गाव सरपंचानेच थाटला शाळेच्या वर्गात डान्सबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:02 IST

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : ‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा...शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे' अशी विद्यामंदिराची महती असली तरी शाळेच्या एका वर्गाला ‘डान्सबार’चे रूप देऊन अश्लील गाण्यांवर मादक हावभाव करीत नृत्यबाला छमा...छम नाचल्या. सरपंचाच्या मर्जीतील २० ते २५ लोकांनी मद्याचे प्याले रिचवत अन् नृत्यबालांवर पैशांची मनसोक्त उधळण करून सरपंचाच्या मुलाचा वाढदिवस ...

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : ‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा...शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे' अशी विद्यामंदिराची महती असली तरी शाळेच्या एका वर्गाला ‘डान्सबार’चे रूप देऊन अश्लील गाण्यांवर मादक हावभाव करीत नृत्यबाला छमा...छम नाचल्या. सरपंचाच्या मर्जीतील २० ते २५ लोकांनी मद्याचे प्याले रिचवत अन् नृत्यबालांवर पैशांची मनसोक्त उधळण करून सरपंचाच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला.तेतरियाच्या प्राथमिक शाळेतील या बीभत्सपणाचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर झळकल्यानंतर शिक्षण खात्याने चौकशीचे आदेश दिले आहेत. शाळेला ७ आॅगस्टला रक्षाबंधनाची सुटी होती. मुलाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी शाळेला सुटी. त्यामुळे सरपंचाने रात्री या एका वर्गात रंगतदार मेजवानी आयोजित केली. डान्सबारही फिका पडावा, असा तो मदमस्त सोहळा होता, असे या व्हिडिओतून स्पष्ट जाणवते.प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीणकुमार तिवारी यांनी व्हिडिओच्या आधारे चौकशीचे आदेश दिले आहेत. तिवारी म्हणाले की, सरपंचाने ५ आॅगस्ट रोजीच मुख्याध्यापकांकडून शाळेच्या चाव्या घेतल्या. शाळेची बरीच कामे सरपंच करीत असल्याने मुख्याध्यापकांनी सरपंचाकडे चाव्या सोपविल्या होत्या.सरपंचाने मात्र वर्गातनृत्य-संगीतासह ओल्या पार्टीचे आयोजन केले. त्या रात्री नृत्यबालांच्या अदांवर फिदा होत सरपंचाच्या चाहत्यांनी मद्याचे प्याले रिचवत पैशांची उधळण केली. त्यानंतर ही मंडळी साफसफाई न करता ही मंडळी तोल सावरत निघून गेली. (वृत्तसंस्था)वर्ग केला स्वच्छमंगळवारी शाळा उघडल्यानंतर वर्गात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि खरकटे अन्न विखुरलेले दिसले. विद्यार्थी आणि शिक्षकांना हा वर्ग स्वच्छ करावा लागला, अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेच्या परिसरात आयोजित करण्याची मुभा नाही. त्या कार्यक्रमास परवानगी मागण्यात आलेली नव्हती, असे शिक्षणाधिकारी तिवारी यांनी स्पष्ट केले.