देवळा तालुक्यात बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
लोहोणेर : सतत दुष्काळाच्या छायेखाली वावर असलेल्या देवळा तालुक्यातील गिरणा काठावरील पूर्वभागास झालेल्या बेमोसमी पावसाने व सहवादळी वार्याने चांगलाच दणका दिला.
देवळा तालुक्यात बेमोसमी पावसाने पिकांचे नुकसान
लोहोणेर : सतत दुष्काळाच्या छायेखाली वावर असलेल्या देवळा तालुक्यातील गिरणा काठावरील पूर्वभागास झालेल्या बेमोसमी पावसाने व सहवादळी वार्याने चांगलाच दणका दिला. या पावसाने वासोळ पाडे, (फुलेनगर), देवपूर पाडे, महालपाटणे, निंबोळा आदि भाग अक्षरश: झोडपून काढला. यामुळे शेतकरी राजा मात्र चांगलाच हतबल झाला आहे.देवळा तालुक्यातील वायव्य भागात बेमोसमी पावसाने वादळी वार्यासह जोरदार हजेरी लावली. सध्या या परिसरात उन्हाळी कांद्याच्या लागवडीचे काम हातघाईवर आहे. काही ठिकाणी लाल कांदा लागवड झाली. यामुळे शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. वासोळपाडा येथील शेतकरी दादाजी श्रावण बागुल यांचा विक्रीसाठी तयार असलेल्या डाळींब बागेतील फळांना गारपिटीमुळे मोठमोठे तडे गेले असून, त्याचबरोबर खंडू शेवाळे, वसंत बागुल, तर देवपूर पाडे येथील भागा आढाव यांचेही मोठ्या प्रमाणात डाळींब बागांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकर्यांच्या नुकसानीचे शासकीय अधिकार्यांनी त्वरित पंचनामे करावेत, अशा सूचना आमदार डॉ. राहुल अहेर व जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी संबंधितांना दिल्या आहेत. (वार्ताहर)इन्फो बॉक्सगारपिटीच्या तडाख्यात दादाजी बागुल यांचा बैल जखमी झाला तर वासोळ पाडा येथील शाळेचे सिमेंटचे पत्रेही फुटले. काही घरावरील सोलर यंत्रणा निकामी झाली तर काही घराचे पत्रे व कौलेही फुटल्याने स्थानिक नागरिक चांगलेच हतबल झाले आहेत.