रावेर तालुक्यात ९६ हेक्टरवर नुकसान
By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST
जळगाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
रावेर तालुक्यात ९६ हेक्टरवर नुकसान
जळगाव : रावेर तालुक्यात रविवार २८ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल येथील ९५.९० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.रविवार २८ रोजी रावेर तालुक्यातील गुलाबवाडी, मोरव्हाल व पाल या तीन गावांमध्ये गारपीट व वादळी पाऊस झाला. गुलाबवाडी गावातील टोमॅटोचे १४.५ हेक्टर, कांद्याचे १२ हेक्टर व गव्हाचे ५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मोरव्हाल गावातील टोमॅटोचे ८ हेक्टर, कांद्याचे ७ तर गव्हाचे ४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाल येथील टोमॅटोचे ११.४० हेक्टर, कांद्याचे २२ आणि गव्हाचे १२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहेत. याबाबतचे पंचनामे रावेर तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत.