शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला; कोरड घशाला !

By admin | Updated: November 4, 2015 00:24 IST

सलिम सय्यद, अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या लिंबोटी धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा असताानासुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पालिकेच्या नळाला २० ते २२ दिवसाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अहमदपूर तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. परंतु, शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

सलिम सय्यद, अहमदपूर : शहरातील पाणीपुरवठा करणार्‍या लिंबोटी धरणात बर्‍यापैकी पाणीसाठा असताानासुद्धा नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पालिकेच्या नळाला २० ते २२ दिवसाला पाणी येत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अहमदपूर तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. परंतु, शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. २० ते २२ दिवसाला एकदा पाणी येत असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात नागरिकांची गैरसोय होत आहे. शहराला लिंबोटी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. लिंबोटी धरणात मुबलक पाण्याचा साठा असूनही शहराला २० ते २२ दिवसाला एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराला कमीत कमी २ ते ४ दिवसाला पाणीपुरवठा करावा, अशी जनतेची मागणी आहे. एकेकाळी अहमदपूर तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे हाती घेतल्याने संपूर्ण तालुक्याचाच कायापालट झाला आहे. तालुक्याला वरदान ठरलेल्या लिंबोटी धरणामुळे परिसराचा कायापालट झाला आहे. माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी अहमदपूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविला आहे. परंतु, नियोजनाअभावी अहमदपूरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.