शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

दलित खासदारांनी द्यावेत राजीनामे

By admin | Updated: August 1, 2016 05:48 IST

दलितांवर भाजपाच्या गुंडाद्वारे देशभर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उदितराज यांच्यासह भाजपाच्या तमाम दलित खासदारांनी आपले राजीनामे सादर केले पाहिजेत

नवी दिल्ली : दलितांवर भाजपाच्या गुंडाद्वारे देशभर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ उदितराज यांच्यासह भाजपाच्या तमाम दलित खासदारांनी आपले राजीनामे सादर केले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ट्विटरवर व्यक्त केली. हिंदुत्वाच्या तथाकथित धर्मरक्षकांविरुद्ध खासदार उदितराज यांनी शनिवारी केलेल्या निवेदनानंतर केजरीवालांची ही प्रतिक्रिया आली आहे. तामिळनाडूत काही दलित कुटुंबांना नागपत्तनमच्या प्राचीन बद्राकालियाम्मन मंदिरात पूजा करण्यास अनुमती देण्यास मज्जाव करण्यात आल्यानंतर, काही दलितांनी इस्लाम धर्म स्वीकारण्याचे ठरवले होते. या पार्श्वभूमीवर कॉन्फडरेशन आॅफ एससी एसटी आॅर्गनायझेशन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे दिल्लीतले दलित खासदार उदितराज यांनी शनिवारी नमूद केले की, ‘मंदिराची दारे दलितांना बंद करण्यात आली तर ते चर्च अथवा मशिदीत जातील. आम्ही त्याला जबाबदार नाही. हिंदुत्वाला जितका धोका तथाकथित धर्मरक्षकांपासून आहे, तितका धर्मांतराच्या प्रक्रियेतूून नाही.’ आपल्या निवेदनाचे अधिक स्पष्टीकरण करताना उदितराज म्हणतात, ‘जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्म नाही, जिथे धर्मरक्षणाच्या नावाखाली आपलेच लोक आपल्याच लोकांवर हल्ले चढवतात. जो कोणी सत्तेवर असतो तो दलितांना लक्ष्य बनवतो. फक्त संख्येतले अंतर कमी अधिक होते. हिंदू धर्माचे सर्वांत मोठे मंदिर कंबोडियात आहे. विशेष म्हणजे आज तिथे एकही हिंदू नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>भारतात हिंदू धर्माचे अस्तित्व संकटात सापडले असे वाटत असेल तर दलित समुदाय त्याला जबाबदार नसून तथाकथित हिंदू धर्मरक्षकच त्याला कारणीभूत ठरणार आहेत. - उदितराज, भाजपा खासदार, दिल्ली