शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

दलित जळीतकांड; विरोधकांचा केंद्रावर हल्ला

By admin | Updated: October 22, 2015 04:08 IST

हरियाणातील फरिदाबादेत एका दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधी पक्षांनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : हरियाणातील फरिदाबादेत एका दलित कुटुंबाला पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटले असून विरोधी पक्षांनी या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.दरम्यान फरिदाबादमध्ये बुधवारी गावकरी माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले. होरपळून मृत्युमुखी पडलेल्या दोन बालकांचे मृतदेह घेऊन त्यांनी दिल्ली-आग्रा महामार्गावर चक्काजाम केला. याच वेळी अनेक राजकीय नेत्यांनीही तेथे हजेरी लावली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना लाठीमार करावा लागला. आंदोलनकर्त्यांना पांगविल्यावर बालकांचे मृतदेह रुग्णावाहिकेने इस्पितळात पाठविण्यात आले.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शेजारील जिल्ह्णातील पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुनपेड गावात जाऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपा आणि रास्वसंघावर दुर्बल आणि गरिबांना चिरडण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला.त्यांच्या या भूमिकेमुळेच अशा घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सरकारवर दबाव आणण्यासाठी आपल्याकडून जी काही मदत हवी असेल ती देण्याची ग्वाही आपण पीडित कुटुंबाला दिली असल्याचे राहुल यांनी सांगितले. फरिदाबादेतील सुनपेड गावात मंगळवारी रात्री सवर्ण समाजातील काही गुंडांनी एका दलित कुटुंबाचे घर पेट्रोल ओतून जाळल्याने या कुटुंबातील दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला तर त्यांचे आईवडील गंभीर जखमी झाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)हरियाणा सरकार : जळीतकांडाच्या सीबीआय चौकशीची शिफारसचंदीगड : फरिदाबाद जिल्ह्णात मंगळवारी घडलेल्या दलित हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस हरियाणा सरकारने केली आहे. सवर्णांनी एका दलित कुटुंबाला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. त्यात दोन बालकांचा मृत्यू झाला होता तर त्यांचे आई-वडील गंभीर जखमी झाले होते. ‘मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केलेली आहे. पोलीस उपायुक्त पुरणचंद यांच्या नेतृत्वाखाली आधीच विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे,’ असे खट्टर यांचे प्रसिद्धी सल्लागार अमित आर्य यांनी सांगितले. या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि राज्य सरकारने पीडित दलित कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केलेली आहे, असे आर्य म्हणाले.राहुल गांधी पत्रकारांवर भडकलेएका पत्रकाराने राहुल गांधी यांना आपण या मुद्याचे राजकारण करीत आहात काय? असा थेट प्रश्न विचारताच ते प्रचंड संतापले. एखाद्याच्या घरी आल्यावर कुणी असे म्हणत असेल तर ते अपमानास्पद आहे. पीडितांचा तो अपमान आहे. मी येथे फोटो काढण्यासाठी आलेलो नाही. लोकांचे जीव जात आहेत आणि तुम्हाला हे फोटोशूट वाटते काय? असा संतप्त सवाल राहुल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला. ‘कष्ट की बात’ करा, लालूप्रसाद, नितीशकुमारांचा टोलाआत्मस्तुतीत रममाण राहणाऱ्या मोदींनी ‘मन की बात’ करण्याऐवजी देशातील पीडित, वंचित, मागास आणि दलितांच्या ‘कष्ट की बात’ केली पाहिजे, अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी टिष्ट्वटरवर केली. नितीशकुमार यांनी आमचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही सुरळीत सुरूआहे, असा दावा करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावे, असे आव्हान त्यांनी टिष्ट्वटरवर दिले.मदतीस विलंब झाल्यास आंदोलन - मायावतीबहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दलित कुटुंबाला जाळण्यात आल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून दोषींना अटक आणि पीडित कुटुंबाला मदतीत थोडाही विलंब झाल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.असहिष्णुतेला देशात अजिबात थारा नाही - राजनाथसिंहकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेवर चिंता व्यक्त करतानाच अशा घटनांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये, असे प्रतिपादन केले. गुरुवारी नवी दिल्लीत भारतीय पोलीस प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जाती, पंथ आणि धर्माच्या नावावर विद्वेष निर्माण करणाऱ्या अशा घटना देशहिताच्या नाहीत. सहिष्णुता आणि एकता हे या देशाचे मूल्य असून त्याची जपणूक झाली पाहिजे.