शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गुजरात, राजस्थानकडे चक्रीवादळाची कूच! मुंबईला अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 10:25 IST

पंतप्रधानांकडून आढावा; १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

नवी दिल्ली : बिपोरजॉय चक्रीवादळाची वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने होत होती; पण आता ते गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने सरकत आहे. सध्या हे वादळ पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर असून, ते १५ जूनपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान १५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वादळाचा मार्ग बदलल्यानंतर एसडीआरएफच्या टीमने गुजरातच्या किनारी भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. हवामान विभागाने सौराष्ट्र, कच्छसह १० जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मुंबईतही हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या सोमवारी दुपारी १२ वाजताच्या अपडेटनुसार, सकाळी साडेआठ वाजता वादळ गुजरातच्या पोरबंदरपासून ३२० किमी अंतरावर होते. द्वारका येथून आतापर्यंत सुमारे १३०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चक्रीवादळाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला.

तब्बल १० दिवस छळणार

  • चक्रीवादळाचा प्रभाव १० दिवस टिकू शकतो. अलीकडच्या काळातील हे सर्वाधिक काळ टिकणारे वादळ
  • गुजरातमधील कच्छ, राजकोट, भावनगर, पोरबंदर, गीर-सोमनाथ, द्वारका, जाखौ, जाफ्राबादमध्ये सतर्कतेचा इशारा.
  • वलसाडमध्ये दक्षता म्हणून सागरी कमांडो तैनात करण्यात आले आहेत.
  • कच्छ जिल्ह्यात कलम १४४ लागू.
  • गुजरातमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना तीन दिवस सुटी. 
  • केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणाऱ्या सभा भाजपकडून १५ जूनपर्यंत रद्द.

पाकिस्तानातही पूर्वतयारी: बिपोरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दक्षिण सिंध प्रांतातील सखल किनारपट्टी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळ