शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कस्टम्स आयुक्त, उपायुक्तांना अटक

By admin | Updated: August 15, 2015 01:35 IST

प्रत्यक्षात न केल्या गेलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या तयार कपड्यांच्या निर्यातीच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांचा सीमाशुल्क परतावा फसवणुकीने दिला गेल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर

नवी दिल्ली : प्रत्यक्षात न केल्या गेलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या तयार कपड्यांच्या निर्यातीच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांचा सीमाशुल्क परतावा फसवणुकीने दिला गेल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुरुवारी सीमाशुल्क आयुक्त अतुल दीक्षित, उपायुक्त नलिन कुमार आणि सहदेव गुप्ता या व्यापाऱ्यास अटक केली.या तिघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता. शुक्रवारी दिवसभर जाजबजबाब घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. या फसवणुकीच्या व्यवहाराने सरकारचा ७४.६१ कोटींचा महसूल बुडाला व तेवढाच लाभ खासगी व्यापाऱ्यास देण्यात आला, असा आरोप आहे.महसुली गुप्तवार्ता संचालनालयाने या प्रकरणाचा तपास केला होता. गुप्ता यांनी सादर केलेला ३०० कोटी रुपयांच्या परताव्याचा दावा स्थगित ठेवावा, असे सांगूनही दीक्षित व कुमार यांनी काहीही केले नाही व ही रक्कम गुप्ता यांच्या खात्यात जमा करेली गेली, असे तपासातून निष्पन्न झाले होते. सूत्रांनुसार गुप्ता यांनी वाढीव रकमेच्या बनावट बिलांच्या आधारे वर्ष २०१३-१४ मध्ये हाँगकाँग व दुबई येथील कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचे तयार कपडे निर्यात केल्याची कागदपत्रे सादर करून त्यावर ३०० कोटी रुपयांच्या सीमाशुल्क परताव्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या कंपन्यांनी त्यांनी हा माल खरेदी केल्याचा इन्कार केला होता.