शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

काश्मिरात संचारबंदी सुरूच, फुटीरवादी नेत्यांना अटक

By admin | Updated: August 14, 2016 01:38 IST

येथील लाल चौकात धरणे आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी प्रशासनाने श्रीनगर जिल्हा आणि अनंतनाग शहरात शनिवारीही संचारबंदी कायम ठेवली.

श्रीनगर : येथील लाल चौकात धरणे आंदोलन करण्याचे फुटीरवाद्यांचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी प्रशासनाने श्रीनगर जिल्हा आणि अनंतनाग शहरात शनिवारीही संचारबंदी कायम ठेवली. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येऊ शकले नाही. त्यातच गोळीबारातील जखमी युवकाचा मृत्यू झाल्यामुळे खोऱ्यातील बळींची संख्या वाढून ५६ झाली आहे. सुहैल अहमद वानी असे या युवकाचे नाव आहे. तो गेल्या आठवड्यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला होता. उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. फुटीरवादी नेते मिरवैझ उमर फारूक आणि सईद अली शाह गिलानी यांचे लाल चौकापर्यंत मार्च काढून तेथे धरणे धरण्याचे प्रयत्न पोलिसांनी शनिवारी उधळून लावले. हे दोन्ही नेते नजरकैदेत आहेत. सर्वात आधी हुरियतचे अध्यक्ष मिरवैझ श्रीनगरजवळील निगीन येथील त्यांच्या निवासस्थानातून दुपारी बाहेर पडले. मात्र, पोलिसांनी त्यांना लगेच अटक केली. मीरवैझ हुरियतच्या सुधारणावादी गटाचे नेतृत्व करतात. हुरियतच्या कट्टरवादी गटाचे प्रमुख गिलानी यांनी हैदरपोरा येथील त्यांच्या निवासस्थानापासून मार्च काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनाही अडविले. तेव्हा गिलानी यांनी त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर धरणे धरली. धरणे आंदोलन अर्धा तास सुरू होते आणि ते शांततेत संपले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन हुरियत गटांसह यासिन मलिक यांच्या नेतृत्वाखालील जेकेएलएफने स्वयंनिर्णयाच्या अधिकाराची मागणी उचलून धरण्यासाठी शनिवारी व रविवारी लाल चौकापर्यंत मार्च काढण्याचे आवाहन केले होते.खोऱ्यात हिंसाचार उफाळल्यानंतर ९ जुलैपासून मिरवैझ आणि गिलानी हे नजरकैदेत आहेत, तर मलिक यांना येथील मध्यवर्ती कारागृहात बंद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)इंटरनेट सेवा काही काळ बंदहिंसाचारामुळे खोऱ्यात शनिवारी काही काळ ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. ब्रॉडबँड सेवा दुपारनंतर साडेचार वाजता बंद करण्यात आली होती. मात्र, पाच वाजता ती पूर्ववत करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, काही ग्राहकांनी अद्याप आपली सेवा खंडितच असल्याची तक्रार केली.