शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात संचारबंदीसदृश परिस्थिती

By admin | Updated: May 30, 2017 01:30 IST

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आल्याने सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदीसदृश

श्रीनगर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आल्याने सलग दुसऱ्या दिवशीही संचारबंदीसदृश स्थिती होती. श्रीनगरमधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सबजार भट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यापासून काश्मीर खोरे हिंसक निदर्शनांनी धुमसत आहे. अनंतनाग आणि शोपिया जिल्हा आणि दक्षिण काश्मीरमधील पुलवामा शहरात तसेच बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यातील दहा जिल्ह्यांपैकी चार जिल्ह्यांतील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.स्थिती नियंत्रणात...रविवारी काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या असल्या, तरी एकूण स्थिती नियंत्रणात आहे.  पुलवामा, कुलगाम, शोपिया आणि सोपोर या ठिकाणी रविवारी दगडफेकीच्या घटना घडल्या; परंतु काश्मीर खोऱ्यातील स्थिती शांत आणि नियंत्रणात आहे, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितले. पोलीस आणि सुरक्षा दले उपद्रवखोरांचा मुकाबला करीत स्थिती हाताळताना कमालीचा संयम बाळगून कारवाई करीत आहेत.बंदमुळे जनजीवन विस्कळीत...दरम्यान, फुटीरवाद्यांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे काश्मीर खोऱ्यातील उर्वरित भागातील सामान्य जनजीवन दुसऱ्या दिवशीही विस्कळीत झाले होते.हुर्रियत कॉन्फरन्सच्या दोन्ही गटांचे चेअरमन आणि फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवैझ उमर फारूक आणि जेकेएलएफचे यासिन मलिक यांनी चकमकीत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या, मंगळवारी त्रालपर्यंत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली असून, गिलानी आणि मीरवैझ यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.मोबाइल इंटरनेट सेवा बंद...प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्री-पेड नंबरवरील दुसरीकडे कॉल करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. काश्मीर विद्यापीठाने सोमवारी आणि मंगळवारी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. श्रीनगरमधील शाळा, महाविद्यालये सोमवारी बंद ठेवण्यात आली होती, तर पुलवामामध्ये दोन दिवस बंद ठेवण्यात आली आहेत. दोन्ही जिल्ह्यांत कलम १४४...मध्य काश्मीरमधील बडगाम आणि गंदेरबल जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात शनिवारी सुरक्षा दलाच्या चकमकीत सबजार भट आणि त्याचा साथीदार मारला गेला होता.