शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घन घन मंगल गाओ...बजाओ (१)

By admin | Updated: August 12, 2015 23:54 IST

- शा. न. खिरवडकर स्मृती शास्त्रीय संगीत समारोह : पहिल्या दिवशीचे सादरीकरण आनंददायी

- शा. न. खिरवडकर स्मृती शास्त्रीय संगीत समारोह : पहिल्या दिवशीचे सादरीकरण आनंददायी
नागपूर : अभिजात शास्त्रीय संगीताचे जाणकार रसिक ॲड. शां. नं. खिरवडकर स्मृती द्विदिवसीय संगीत समारोहाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. संस्कार भारती, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, ताल साधना समूह, धरमपेठ गृहनिर्माण सहकारी संस्था, अधिवक्ता परिषद व खिरवडकर कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृबह, लक्ष्मीनगर येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला. नागपूर आकाशवाणीचे सुपरिचित अ श्रेणी कलावंत शिरीश भालेराव यांचे व्हायोलिन वादन आणि सुप्रसिद्ध गायिका गौरी पाठारे, मुंबई यांचे शास्त्रीय गायन पहिल्या दिवशी सादर करण्यात आले.
महोत्सवाचे उद्घाटन स्वामी समर्थ मठ, मालवीयनगरचे अध्यक्ष अजय खोलापूरकर, कीर्तनकेसरी शेवाळकर संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चित्रा मोडक संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार, पं. भय्याजी सामक, ॲड मधुकरराव सोमलवार, संस्कार भारतीचे वीरेन चांडक, मनोज श्रोती, ताल साधना समूहाचे रवी सातफळे, सुप्रसिद्ध गायिका डॉ. कल्याणी देशमुख व डॉ. दीपक खिरवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कल्याणी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सेन्सॉर बोर्ड सदस्य चंद्रकांत घरोटे, साहित्य संस्कृती मंडळावरील नियुक्तीबाबत प्रकाश एदलाबादकर, आशुतोष अडोणी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रथम सत्रात विदर्भातील प्रतिभावंत कलावंत शिरीश भालेराव यांच्या सुरेल व्हायोलिन वादनाने रंगत आणली. त्यांचे वादन राग आणि स्वरसंगीताच्या प्रभावी व प्रवाही अनुभूतीचे वादन होते. शिरीश यांनी राग श्री सुरेलतेने स्वरांकित करुन गायकी व तंत अंगासह आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. वादकाचे खेचवरील नियंत्रण, लयकारीवरील पकड आणि राजेश मौंदेकर यांची अनुरुप तबलासंगत प्रशंसनीय होती. यानंतर गौरी पाठारे यांच्या गायनाने रसिकांना जिंकले. बालपणापासूनच नादस्वरांच्या सानिध्यात रंगलेल्या या गायिकेचा अनोखा - गाजदार स्वर, शास्त्र नियमांची अदब राखून केलेला स्वरविस्तार आनंददायी होता. ध्रुपद-किराणा-जयपूर - आग्रा घराण्याची सौंदर्यात्मक शैली रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारी होती. राज जयजयवंतीने त्यांनी सादरीकरणाला प्रारंभ केला. त्यांना तबल्यावर राजू गुजर, संवादिनीवर श्रीकांत पिसे यांनी साथसंगत केली. अंकिता मोहरील, सुमेधा माखेर यांनी तानपुरासंगत केली. महोत्सवाचे संचालन स्मिता खनगई यांनी केले.