शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

साधूंची गर्दी १८ जुलैनंतर

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

नियोजन : जगन्नाथपुरीच्या यात्रेनंतर दोन लाख साधू येणार

नियोजन : जगन्नाथपुरीच्या यात्रेनंतर दोन लाख साधू येणार

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून साधू-महंत येण्यास प्रारंभ झाला असला, तरी साधूंच्या संख्येत खरी वाढ येत्या १८ जुलैनंतरच होणार आहे. ओरिसातील जगन्नाथपुरी येथे १८ जुलैपासून दहा दिवस रथयात्रेचा उत्सव सुरू होत असून, त्याचा मुख्य सोहळा आटोपल्यावर साधूंचा नाशिककडे ओघ वाढणार आहे.
कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण उद्या होत असून, येत्या २९ ऑगस्ट रोजी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे प्रथम शाहीस्नान होणार आहे. या पार्श्वभूमीवर साधुग्राममध्ये साधूंची वर्दळ वाढली असून, देशभरातील विविध आखाड्यांतून साधू-महंत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहेत. तथापि, १८ जुलै जगन्नाथपुरी येथील प्रसिद्ध रथयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदाच्या वर्षी या मंदिरातील श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा व सुदर्शन या चार मूर्तींचा नवकलेवर विधी होणार आहे. जुन्या मूर्तींचे विसर्जन करून नव्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तब्बल १९ वर्षांनी हा विधी होणार आहे. हा सोहळादेखील साधूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने अनेकांनी आपले नाशिकमधील आगमन लांबवले आहे. १८ रोजी मुख्य रथयात्रेचा कार्यक्रम असून, हा सोहळा दहा दिवस चालणार आहे. तथापि, बहुतांश साधू मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर नाशिककडे कूच करणार आहेत. या यात्रेसाठी शैव, वैष्णव, नाथ व उदासी अशा चारही संप्रदायांचे देशाच्या कानाकोपर्‍यातून सुमारे दोन लाखांहून अधिक साधू-महंत दाखल झाले आहेत. ते तेथील कार्यक्रम आटोपून नाशिकच्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी येणार आहेत.

सोहळाही महत्त्वाचा
साधूंसाठी कुंभमेळ्यासह जगन्नाथपुरीचा सोहळाही महत्त्वाचा आहे. १९ वर्षांनंतर तेथे नवकलेवराचा विधी होणार आहे. त्यामुळे साधूंनी तिकडचा सोहळा आटोपून नाशिकला येण्याचे नियोजन केले आहे. आमच्या आखाड्याचे सुमारे पाचशे संत-महात्मे जगन्नाथपुरीचा सोहळा झाल्यावर नाशिकला येतील.
- महंत ध्रुवदास स्वामी,
दिगंबर आखाडा
(फोटो आहे : १३ पीएजजेएल ६८)