-अन् गर्दी वाढतच गेली
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST
-अन् गर्दी वाढतच गेलीनागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसाने काही क्षणाची उसंत घेतली. उद्घाटनाचे सोपस्कार पार पडले. आडोशाला आलेले रसिक ...
-अन् गर्दी वाढतच गेली
-अन् गर्दी वाढतच गेलीनागपूर महोत्सव आणि पाऊस हे गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. याही वर्षी पावसाने ऐन महोत्सवाच्या उद्घाटनालाच हजेरी लावली. पावसाच्या येण्याने अनेकांनी आडोसा शोधला. पावसामुळे महोत्सवाची रंगत हरवेल की काय अशी भीती असताना, पावसाने काही क्षणाची उसंत घेतली. उद्घाटनाचे सोपस्कार पार पडले. आडोशाला आलेले रसिक पुन्हा मैदानावर जमू लागले. सूत्रसंचालक अनुजा घाडगे हिने आपल्या शब्दांच्या मोहिनीने रसिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. त्यातच मोहित चौहान यांचे स्टेजवर आगमन झाले. अन् हळुहळु गर्दी वाढतच गेली. सलग दोन तास मोहितने नागपूरकरांच्या उत्साहाला टिकवून ठेवले. - तरुणांचा उत्साहतरुणाईच्या हृदयावर राज करणारा मोहित चौहानचे नागपूर महोत्सवात आगमन होत असल्याने नागपूरकर तरुण, तरुणीचे कट्टे आज सायंकाळी यशवंत स्टेडियममध्ये पोहचले. सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने तरुणाईच्या उत्साहावर पाणी फिरेल की काय अशी भीती होती. नागपुरात पहिल्यांदा येत असलेल्या मोहितला ऐकण्यासाठी पावसानेही काहिशी उसंत घेतली आणि मग काय, मोहितच्या प्रत्येक गाण्यावर तरुणाईचा जोश ओसंडून वाहत होता. गाण्याची एक ओळ मोहित तर दुसरी ओळ रसिकांतून येत होती. या सोहळ्याला आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मोबाईलचे फ्लॅश चकाकत होते. तरुणाईच्या काही ग्रुप सेल्फी काढून धम्माल करीत होते. काहींनी गाण्यावर ताल धरला होता. मागच्या रांगेतील तरुण थिरकायला लागले होते. वन्स मोअरचा गजर, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, मोहितच्या प्रत्येक गीताला मिळत होता. - ग्रीन लिव्हिंगची शपथमहोत्सवात येणाऱ्यांमध्ये पर्यावरणा संदर्भात जनजागृती करण्यासाठी नागपूर महापालिकेने ग्रीन विजिल या संघटनेसाठी एक स्टॉल उपलब्ध करून दिला होता. ग्रीन विजिलचे अध्यक्ष कौस्तुभ चॅटर्जी व त्यांचे १७ व्हॉलेंटिअर महोत्सवात येणाऱ्यांशी चर्चा करून, पर्यावरण संरक्षण व स्वच्छ नागपूर या उपक्रमासाठी जनजागृती करीत होते. आम आदमीचा पर्यावरण संरक्षणासाठी कसा हातभार लागेल यासाठी त्यांना प्रोत्साहित करीत होते. पाण्याचा कमीत कमी वापर करा, ऊर्जेची बचत करा, कार पुलिंगचा जास्तीत जास्त वापर करा, झाडे लावा, त्याचे संरक्षण करा असा संदेश हे व्हॉलेंटिअर येणाऱ्यांना देत होते. त्यांच्याकडून ग्रीन लिव्हिंगची शपथ घ्यायला भाग पाडत होते. यात दक्षा बोरकर, कल्याणी वैद्य, नगमा खान, मेहुल कोसुरकर, विकास यादव आदींचा सहभाग होता.