शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कार उत्पादक कंपन्यांना अडीच हजार कोटींचा दंड

By admin | Updated: August 26, 2014 11:43 IST

निकोप स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करणा-या १४ कार उत्पादक कंपन्याना भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने तब्बल अडीच हजार कोटींचा दंड ठोठावला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - निकोप स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन करणा-या कंपन्यांवर भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आयोगाने भारतातील १४ कार उत्पादक कंपन्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून यामध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझूकी या कंपन्यांचा समावेश आहे.

भारतातील कार उत्पादक कंपन्या बाजारपेठेत निकोप स्पर्धा करत नाही अशी तक्रार भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाकडे (कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया - सीसीआय) आली होती. या तक्रारींची दखल घेत आयोगाने सखोल चौकशीअंती २१५ पानी निर्णय दिला आहे. विशिष्ट ब्रँडची गाडी घेतल्यावर ग्राहकाला गाडीमध्ये त्याच ब्रँडचे स्पेअरपार्ट वापरावे लागत होते. तसेच गाडीची सर्व्हिसिंगही त्याच कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये करावी लागते. या सर्व्हिसिंगमध्ये ग्राहकाकडून हजारो रुपये उकळले जातात. ग्राहकाने गाडीध्ये स्थानिक किंवा विदेशी उत्पादकांचे स्पेअर पार्टचा गाडीत वापर केल्यास तसेच अन्य सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंग केल्यास त्या ग्राहकाला वॉरंटीचा फायदा दिला जात नाही. त्यामुळे बाजारपेठेत निकोप स्पर्धा होत नाही असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.  
प्रतिस्पर्धी आयोगातील कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीसीआयने टाटा मोटर्सला १, ३४६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याखालोखाल मारुती सुझूकी (४७१ कोटी), महिंद्रा अँड महिंद्रा (२९२ कोटी), जनरल मोटर्स (८५ कोटी) आणि होंडा कार (७६ कोटी) यांचा क्रमांक लागतो. फियाट, बीएमडब्ल्यू, फोर्ड आणि अन्य आठ कंपन्यांनाही या दंड आकारण्यात आला आहे. सीसीआयने ऐवढ्या मोठ्या प्रमाणात दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ असून या निर्णयाला कंपन्यांकडून कोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.