शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरवाद्यांवर अंकुश हवा - मेहबूबा मुफ्ती

By admin | Updated: December 6, 2015 01:33 IST

हिंदुत्वाच्या नावावर सक्रिय कट्टरवादी तत्त्वांवर अंकुश घालण्यात येईल, अशी अपेक्षा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

नवी दिल्ली : हिंदुत्वाच्या नावावर सक्रिय कट्टरवादी तत्त्वांवर अंकुश घालण्यात येईल, अशी अपेक्षा पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. मेहबूबा यांनी या कट्टरवाद्यांची तुलना इस्लामचा गैरवापर करणाऱ्या इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेशी केली.येथे एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, सहिष्णुता ही आमच्या देशाची शक्ती आहे. आम्ही या कट्टरवाद्यांना वेळीच रोखले नाही तर काय होईल? सिरिया, अफगाणिस्तान, इराकमध्ये काय सुरू आहे. ते सुद्धा कट्टरवादीच असून इस्लामच्या नावाचा दुरुपयोग करीत आहेत. दुसरीकडे आमच्या देशातील कट्टरवादी हिंदुत्वाचा गैरवापर करीत असून याची तुलना ते राष्ट्रवादाशी करीत आहेत. ही आणखी चुकीची गोष्ट आहे. मेहबूबा यांचा पीडीपी पक्ष जम्मू-काश्मिरात भाजपासोबत सत्तेत आहे.बिहार निवडणुकीत या कट्टरवादी तत्त्वांना चांगला धडा शिकविण्यात आला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानात जाण्याची भाषा केली जाते आणि ही वक्तव्ये करण्यात काही केंद्रीय मंत्रीसुद्धा असतात. आपल्या पक्षाला हे योग्य वाटते काय? असा प्रश्न मेहबूबा मुफ्ती यांना विचारण्यात आला होता. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या जागी आपण मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे काय? असा प्रश्न विचारला असता हा प्रश्न मला फारसा भावणारा नाही. कारण याबद्दल विचार करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी लोकांसाठी काम करीत असून पुढेही करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)देशातील जनता महागाईचा सामना करीत असताना, त्यांना कांदेही उपलब्ध होत नसताना अचानक काही लोक एखाद्या व्यक्तीने कुठले मांस खाल्ले पाहिजे हे सांगणे सुरू करतात. हे कदापि स्वीकारार्ह नाही. - मेहबूबा मुफ्ती, अध्यक्ष, पीडीपी