शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

क्रॉम्प्टन ग्रीव्हज्मध्ये उत्पादनाला सुरुवात संप मिटला : कामगार संघटना मान्यतेच्या वादावर न्यायालयच अंतिम निर्णय घेणार

By admin | Updated: August 23, 2015 00:04 IST

सातपूर : कामगार संघटनेच्या वादावरून दोन डाव्या चळवळीतील संघटनांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अंबडमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. सीटू प्रणीत संघटनेला मान्यता देण्यासंदर्भात न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्याचा तोडगा उभयतांनी मान्य केल्याने क्रॉम्प्टनची चाके फिरू लागली. सायंकाळी सात वाजता कंपनीत उत्पादनही सुरू झाले आहे.

सातपूर : कामगार संघटनेच्या वादावरून दोन डाव्या चळवळीतील संघटनांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे अंबडमधील क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीत गेल्या शंभर दिवसांहून अधिक काळ सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. सीटू प्रणीत संघटनेला मान्यता देण्यासंदर्भात न्यायालय देईल तो निर्णय मान्य करण्याचा तोडगा उभयतांनी मान्य केल्याने क्रॉम्प्टनची चाके फिरू लागली. सायंकाळी सात वाजता कंपनीत उत्पादनही सुरू झाले आहे.कामगार उपआयुक्त कार्यालयात कामगार उपआयुक्त एस. आर. जाधव यांनी घेतलेली बैठक अखेरीस यशस्वी ठरली. शुक्रवारी सुमारे सात तास मॅरेथॉन बैठक झाल्यानंतर अखेरीस हा वाद मिटला. गेल्या १०३ दिवसांपासून हा संप सुरू होता. सुमारे पाचशे कामगार असलेल्या या कारखान्यात सुरुवातीपासून आयटक प्रणीत कामगार संघटना मान्यता प्राप्त आहे. परंतु गेल्या वर्षी सीटूचे सभासदत्व स्वीकारलेल्या कामगारांनी आधी वेतन करारास विरोध आणि तद्नंतर मान्यतेच्या विषयावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सीटूच्या सभासदत्व स्वीकारलेल्या कामगारांनी संपाची नोटीस दिल्यानंतर काम बंद आंदोलन सुरू होते. कामगार संघटनेच्या मान्यतेसंदर्भात औद्योगिक न्यायालयात दावा प्रविष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात आता न्यायालयाचा निर्णय अंतिम ठरेल असे ठरल्याचे कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव यांनी सांगितले. अर्थात, या विषयावर खूपच चर्चा झाली नसल्याचे वृत्त आहेे. कंपनी व्यवस्थापनाने निलंबित केलेल्या २७ कामगारांना कामावर रूजू करून घेऊन घ्यावे; मात्र त्यांची सुरू असलेली चौकशी पूर्ण करावी, संबंधित कामगार दोषी आढळल्यास त्यांना सौम्य शिक्षा करावी, असेही ठरविण्यात आले.कामगार संघटनेच्या मान्यतेच्या विषयावरून हा विषय असला तरी क्रॉम्प्टन व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा संप मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या त्यावेळी क्रॉम्प्टनचे अधिकारी उपस्थित नव्हते. मध्यंतरी निमा, आयमाचे पदाधिकारी आणि सीटूचे नेते यांच्यात बैठक झाली तेव्हा नाशिकमध्ये क्रॉम्प्टनचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले होते. त्यानंतर निमा, आयमाच्या पदाधिकार्‍यांनी यासंदर्भात कामगार उपआयुक्तांना साकडे घातल्यानंतरही बैठक घेण्यात आली. या बैठकीस क्रॉम्प्टनचे अधिकारी शशी रंजन, अलोक खरे, मंगेश वागळे, अक्षय सिक्वेरा, सीटूचे सरचिटणीस डॉ. डी. एल. कराड तसेच निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, सरचिटणीस मंगेश पाटणकर, माजी अध्यक्ष मनीष कोठारी, एच.आर.आय.आर. समितीचे अध्यक्ष मोहन पाटील, आयमाचे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, जोड