शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर अनुसूचित जाती-जमातींवर केलेली टीका आता दंडात्मक गुन्हा

By admin | Updated: July 4, 2017 09:07 IST

सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समुदायातील कोणत्याही व्यक्तीविरूद्ध अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 4-  सोशल मीडियावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समुदायातील कोणत्याही व्यक्तीविरूद्ध अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. दिल्ली हायकोर्टाने सोमवारी एका प्रकरणावर सुनावणी करताना तसा निकाल दिला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कोणत्याही व्यक्ती विरूद्ध सोशल मीडियावर तसंच ग्रुप चॅटमध्ये अपमानास्पद वक्तव्य केलं तर तो दंडात्मक गुन्हा असेल, असं दिल्ली हायकोर्टाने सोमवारी म्हंटलं आहे.  द टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे. 
 
एससी आणि एसटी (अत्याचार प्रतिबंध) अॅक्ट 1989 हा या समुदायातील लोकांवर सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या सर्वसामान्य टीकेवरही लागू होतो. एका फेसबुक पोस्टवरून दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे वक्तव्य केलं आहे. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, या अधिनियमात व्हॉट्सअॅपवर होणाऱ्या संभाषणाचाही सहभाग होऊ शकतो. 
न्यायमूर्ती विपीन सांघी यांनी म्हंटलं, "फेसबूक युजर आपल्या फेसबुकवरील सेटिंग प्रायव्हेटवरून पब्लिक करत असतो. यानुसार त्या व्यक्तीच्या वॉलवर पोस्ट केलेल्या गोष्टी त्याच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांसह इतर लोकही पाहू शकतात. कोणतीही अपमानास्पद पोस्ट केल्यानंतर जर फेसबुकवरील प्रायव्हसी सेटिंग पब्लिकवरून प्रायव्हेट केली, तरीही एससी/एसटी अॅक्ट 3(1)(एक्स)  अंतर्गत तो दंडात्मक अपराध मानला जाइल.  
 
सोमवारी दिल्ली हायकोर्टात एका एससी समुदायातील महिलेच्या याचिकेवर सुनावणी झाली. या महिलेने तिच्या राजपूत घराण्यातील असलेल्या जावेवर आरोप केले होते. ती महिला सोशल साइट्सवर आपल्या जातीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करते तसंच धोबी समाजातील महिलांबद्दलही आक्षेपार्ह टीपण्णी करते, असा आरोप याचिकाकर्त्या महिलेने केला होता. 
आपल्या बचावासाठी त्या राजपूत महिलेने कोर्टाला सांगितलं, जर माझ्या फेसबुक पोस्टला खरं मानलं तर फेसबुक वॉल माझी वैयक्तिक आहे.  कुणालाही दुखवायचा माझा हेतू नव्हता. माझ्या मोठ्या जावेचा मी केलेल्या पोस्टमध्ये उल्लेख नव्हता. तसंच धोबी समाजातील महिलांविरूद्ध केलेली पोस्ट कुठल्याही एका व्यक्तीसाठी नव्हती. आपल्या स्पष्टीकरणात आरोपी महिलेने शेवटी म्हंटलं, फेसबुक वॉल प्रत्येकाची वैयक्तिक गोष्ट असते. त्यामुळे तेथील पोस्ट वाचून त्या आपल्यासाठीच आहेत हे ठरविण्याता कोणालाही अधिकार नाही. 
 
दुसरीकडे, आरोपीने एससी-एसटी कायद्याअंतर्गत गुन्हा केला आहे. त्या राजपूत महिलेने मुद्दामून तिच्या दलित समाजातील जावेचा अपमान करण्यासाठी फेसबुक पोस्ट केली, असं याचिकाकर्त्यांच्या वकील नंदिता राव यांनी कोर्टाला सांगितलं आहे. 
 
दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने राजपूत महिलेच्याविरूद्ध दाखल केलेला एफआयआर नाकारला आहे. जर एखाद्या व्यक्तीने सामान्यपणे फेसबुक पोस्ट केली आहे आणि कुठल्याही जातीच्या व्यक्तीला लक्ष करण्याचा त्या व्यक्तीचा हेतू नसेल, तर तो गुन्हा मानला जाणार नाही, असं कोर्टाने म्हंटलं आहे.