शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे वार्ता - जोड

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

मेडिकलमधून महिला डॉक्टरची बॅग लंपास

मेडिकलमधून महिला डॉक्टरची बॅग लंपास
नागपूर : शंकरनगरातील डॉ. अर्चना हेमंत देशपांडे (५४) व त्यांच्या सहयोगी प्राध्यापिका धरित्री मुकुंद भट (४९) रा. मेडिकल कॉलनी, भगवाननगर या दोघीही एका सेमिनारसाठी मेडिकल कॉलेजमध्ये आल्या होत्या. सेमिनारमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या बॅग ज्यात दोन लॅपटॉप, एक कॅमेरा, मोबाईल, लेटर बॅड, २०० रुपये रोख व इतर कागदपत्र असा १,०५,२०० रुपयांचा मुद्देमाल मेडिकलच्या विकृतीशास्त्र विभागातील लेडीज कॉमन रुममध्ये ठेवून सेमिनारमध्ये सहभागी झाल्या. अज्ञात चोरट्याने रुमचा दरवाजा उघडून दोन्ही बॅग लंपास केल्या. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
०-०-०-०-०-०-००
नवजात अर्भक नालीत आढळले
नागपूर : वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील रमाबाई चौक, आंबेडकरनगर येथील मोरेश्वर पाटील यांच्या घरासमोर नालीत एक नवजात अर्भक आढळले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडील पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध भादंविच्या कलम ३१८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
०-०-०-०-०-०-०
गाडीच्या डिक्कीतून २० हजार पळविले
नागपूर : मेडिकल क्वॉर्टर, जाटतरोडी, टीबी वार्ड येथील रहिवासी निधी सुरेंद्र यादव (२२) या युवतीने आपल्या घरासमोर दुचाकी गाडी उभी केली होती. गाडीच्या डिक्कीत त्यांनी ठेवलेल्या पर्समध्ये २० हजार रुपये रोख व इतर कागदपत्रे होती. दुपारी १२ च्या सुमारास अज्ञात चोरट्याने बाहेर कुणीही नसल्याचे बघून डिक्की उघडून गाडीतील पर्स पळविली. इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
०-०-०-०-०-०-०-०-
गिट्टीखदान परिसरात महिलेचा विनयभंग
नागपूर : गिट्टीखदान परिसरात राहणारी एक ३५ वर्षीय महिला आपल्या घरापुढे उभी असताना, इंद्रप्रताप सिंग (१९) रा. गिट्टीखदान हा आपल्या मित्रासोबत मोठ्याने बोलत असल्यामुळे महिलेने त्याला हटकले. त्यामुळे इंद्रप्रताप याने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. त्याचबरोबर भानुप्रताप सिंग सुरेंद्रप्रताप सिंग (४५) रा. गिट्टीखदान यानेही महिलेला शिवीगाळ करून, महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, आरोपींना अटक केली आहे.
०-०-०--०-०-००-०---