शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, कॉँग्रेस,राष्ट्रवादी व सेनेच्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

By admin | Updated: November 7, 2015 23:27 IST

नियमबा‘ आंदोलन : तीन आमदार, एक खासदार व नगरसेवकांचा समावेश

नियमबा‘ आंदोलन : तीन आमदार, एक खासदार व नगरसेवकांचा समावेश
जळगाव: पूर्व परवानगी न घेता मोर्चा, उपोषण, धरणे व थाळीनाद आंदोलन तसेच परवानगी पेक्षा जास्त जणांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश करणार्‍या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या ५७ जणांवर शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार गुरुमुख जगवाणी, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता, कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ.राधेशाम चौधरी यांच्यासह ५७ जणांचा समावेश आहे.
दुखवटा साहित्य नेणे महागात
अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांच्या नावाच्या पाटीला दुखवटा साहित्य लावून त्यांच्या दालनात ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त जणांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याने दीपक गुप्ता, गजानन मालपुरे, मोहन तिवारी, शिवराम पाटील, राजेंद्र पाटील, परवेज पठाण, डॉ.राधेशाम चौधरी, कपील ठाकुर, महेश शिंपी, विजय राठोड, प्रताप पाटील, राहुल नेतलेकर, सागर कुटुंबळे, भगवान सोनार व सुनीता भालेराव यांच्यावर कॉन्स्टेबल उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.
राष्ट्रवादीच्या तेरा जणांवर गुन्हे
जमावबंदी आदेश लागू असताना तसेच कोणतीही परवानगी न घेता २९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील,खासदार ईश्वरलाल जैन, गफ्फार मलिक, विशाल देवकर, रवींद्र पाटील, परेश कोल्हे, मिनल पाटील, राजेश पाटील, मंगला पाटील, वाल्मिक पाटील, कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ, दीपाली पाटील यांच्यासह अन्य ५० ते ६० जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.