गुन्हे वार्ता
By admin | Updated: August 29, 2015 00:20 IST
डेव्हलपर्सची फसवणूक नागपूर : स्वत:ला गृहनिर्माण संस्थेचा सचिव असल्याचे सांगून एकाने डेव्हलपर्सची फसवणूक केली. प्रशांत बागडदेव (५१) पोस्ट कॉलनी प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. बागडदेव याने स्वत:ला गृहनिर्माण पत संस्थेचा सचिव असल्याचे सागून डेव्हलपर्स अभिषेक देवासे यांना प्लॉटची विक्री केली. याच्या बदल्यात देवासे यांच्याकडून ११ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे ...
गुन्हे वार्ता
डेव्हलपर्सची फसवणूक नागपूर : स्वत:ला गृहनिर्माण संस्थेचा सचिव असल्याचे सांगून एकाने डेव्हलपर्सची फसवणूक केली. प्रशांत बागडदेव (५१) पोस्ट कॉलनी प्रतापनगर असे आरोपीचे नाव आहे. बागडदेव याने स्वत:ला गृहनिर्माण पत संस्थेचा सचिव असल्याचे सागून डेव्हलपर्स अभिषेक देवासे यांना प्लॉटची विक्री केली. याच्या बदल्यात देवासे यांच्याकडून ११ लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर देवासे यांनी बागडदेव यांना आपले पैसे परत मागितले. परंतु त्याने पैसे परत न करता खोट्या प्रकरणात फसविण्याची धमकी दिली. त्यावर देासे यांनी वाडी पोलिसात तक्रार दाखल केली. सिव्हील लाईन्समध्ये सट्टेबाजास अटक नागपूर : सिव्हल लाईन्स येथील सीटीओ परिसरात सट्ट्याची खायवडी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. अनिल बन (३५) रा. अजनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इमारतीवरून पडून वृद्धाचा मृत्यू नागपूर : इमारतीवरून पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. भगवान पंचमतीया (७५) रा. द्वारका अपार्टमेंट छापरूनगर असे मृताचे नाव आहे. ते शुक्रवारी सकाळी इमारतीवरून खाली पडले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.