गुन्हे वार्ता
By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST
त्रिमूर्तीनगरात महिलेचे मंगळसूत्र पळविले
गुन्हे वार्ता
त्रिमूर्तीनगरात महिलेचे मंगळसूत्र पळविलेनागपूर : त्रिमूर्तीनगर एनआयटी लेआऊट येथील रहिवासी प्रणिता बाबासाहेब गुडधे (६०) एका खासगी कामानिमित्त जात होत्या. एनआयटी लेआऊट येथील श्रीहरी अपार्टमेंटजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्याला थाप मारून मंगळसूत्र व सोन्याची कंठीमाळ पळवून नेली. जवळपास दीड लाख रुपयांचा हा मुद्देमाल होता. हे दोनही इसम २५ ते ३० वयोगटातील होते. त्यांनी या प्रकरणी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करून सोन्याची चेन हिसकावलीनागपूर : राणी दुर्गावती चौक येथील रहिवासी जुबेर शेख ऊर्फ नाशीर शेख (२७) हे आपल्या जरीपटका येथील चिकन सेंटरमध्ये असताना, आरोपी संतोष सीताराम शाहू (३६) रा. पाटणकर चौक याने जुबेर शेख याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांना केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला पळविलेनागपूर : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यशोदा पब्लिक स्कूल समोरून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपींनी पळवून नेल्याची तक्रार एमआयडीसी पोलिसांनी नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गळफास घेऊन युवकाची आत्महत्यानागपूर : हनुमानमंदिर, रेल्वेलाईन रोड, जरीपटका येथे राहणारा अजय भीमराव गवई (२६) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी राज वैष्णव याने दिलेल्या सूचनेनुसार जरीपटका पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.