शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

टिप्पर गँगमधील सराईत गुन्हेगारांच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: July 13, 2016 00:13 IST

नाशिक : सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा सूत्रधार नासीर पठाण, गण्या कावळ्या यांच्यासह आठ सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी २ जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली़ या सर्वांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्व गुन्हेगारांना मंगळवारी (दि़१२) न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, या टोळीतील सराईत गुन्हेगार गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या याने एका साक्षीदारास धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिक : सिडकोतील कुप्रसिद्ध टिप्पर गँगचा सूत्रधार नासीर पठाण, गण्या कावळ्या यांच्यासह आठ सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तांनी २ जुलै रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली़ या सर्वांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती़ या सर्व गुन्हेगारांना मंगळवारी (दि़१२) न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली आहे़ दरम्यान, या टोळीतील सराईत गुन्हेगार गणेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या याने एका साक्षीदारास धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडकोतील टिप्पर गँगचे प्रमुख सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असतानाही गुन्हेगारीच्या घटना घडत होत्या़ टिप्परची दुसरी फळी सक्रिय झाल्याचे पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्या लक्षात आले़ त्यांनी शाकीर नासीर पठाण, गणेश सुरेश वाघ ऊर्फ गण्या कावळ्या, मुकेश दलपतसिंग राजपतू, वसीम शेख, शाहीद सय्यद, सोन्या बापू पवार, देवदत्त तुळशीराम घाटोळे, किरण ज्ञानेश्वर पेलमहाले या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई केली़सिडकोतील शुभम पार्कमधील एका फळविक्रेत्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर गँगमधील गुंडांविरोधात मोक्कान्वये कारवाई केली आहे. या गुंडांच्या पोलीस कोठडीदरम्यान मुकेश राजपूत, गण्या कावळ्यासह इतर गुन्हेगार शिवाजीनगरमधील ध्रुवनगर परिसरातील एका इमारतीत राहात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी घरमालकावर गुन्हा दाखल केला आहे. या टोळीतील गुन्हेगारांच्या आर्थिक स्त्रोताचा तपासही पोलीस करीत आहेत. दरम्यान, टिप्पर गँग स्थावर मिळकतीच्या व्यवहारांमध्येही असल्याचे समोर आले असून, त्यांना सिन्नरमधील अमोल जाधव व गोरख वर्‍हाडे या संशयितांकडून आर्थिक मदत केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ मंगळवारी या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले असता मोक्कातील आरोपींच्या आठ वकिलांनी सुमारे दीड तास युक्तिवाद केला़ तर विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलिसांच्या बाजूने ठोस युक्तिवाद केल्याने न्यायालयाने या संशयितांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ केली आहे़ (प्रतिनिधी)