फसवणूक प्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
नागपूर : साडेसात लाखांची वायर घेतल्यानंतर न वटणारा चेक देणाऱ्या औरंगाबादच्या एका कंपनी मालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रविकांत शिंदे असे त्यांचे नाव असून, ते एमआयडीसी वाळुज औरगाबाद येथील गजानन इंटरप्राईजेस कंपनीचे मालक आहेत.
फसवणूक प्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा
नागपूर : साडेसात लाखांची वायर घेतल्यानंतर न वटणारा चेक देणाऱ्या औरंगाबादच्या एका कंपनी मालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रविकांत शिंदे असे त्यांचे नाव असून, ते एमआयडीसी वाळुज औरगाबाद येथील गजानन इंटरप्राईजेस कंपनीचे मालक आहेत. हिंगणा एमआयडीसीत वेलमेंट टेक्नालॉजी प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीकडून शिंदे यांनी ७ लाख, ५५ हजारांची वेल्डींग वायर विकत घेतली होती. त्याबदल्यात वेलमेंटला चेक दिला होता. मात्र, खात्यात रक्कम नसल्यामुळे हा चेक वटलाच नाही. त्यानंतर शिंदे यांनी २२ जानेवारी २०१५ पासून रक्कम देण्यास टाळाटाळ केल्यामुळे अमोल अभयराव पांडे (वय ३५, रा. हिंगणा) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एमआयडीसी पोलिसांनी चौकशीअंती शिंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.---