सोयाबीनचे नुकसान केल्याप्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा
By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST
लातूर : तालुक्यातील गंगापूर येथील एका महिलेच्या शेतातील अर्धा एकरावरील सोयबीनचे नुकसान करुन, त्या महिलेस शिविगाळ केल्याप्रकरणी चौघाविरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयाबीनचे नुकसान केल्याप्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा
लातूर : तालुक्यातील गंगापूर येथील एका महिलेच्या शेतातील अर्धा एकरावरील सोयबीनचे नुकसान करुन, त्या महिलेस शिविगाळ केल्याप्रकरणी चौघाविरोधात लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगापूर येथील कमलबाई श्रीरंग कुकडे वय ७७ यांच्या शेतातील अर्धा एकरावरील सोयबीन पीकाचे रघुनाथ रामा कुकडे, सतिश शिवाजी कुकडे, रावसाहेब रामा कुकडे, संजिवान सदाशिव कुकडे सर्व रा. गंगापूर यांनी नुकसान केले. या नुकसानीचा कमलाबाई कुकडे यांनी जाब विचारला असता चौघांनी शिविगाळ केली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.