शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्राईम फोल्डर

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

अल्पवयीन मुलीला पळविले

अल्पवयीन मुलीला पळविले
नागपूर : धंतोलीतील अमोघ रामटेके (वय २०) याने गिट्टीखदानमधील एका १७ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले. मंगळवारी दुपारी १ वाजता ही घटना उघडकीस आली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
---
किराणा दुकानदारावर चाकूहल्ला
तीन हजार रुपये पळविले
नागपूर : सिगारेटचे पैसे मागितले म्हणून किराणा दुकानदारावर तिघांनी चाकूहल्ला करून गल्ल्यातील तीन हजार रुपये लुटून नेले. बुधवारी रात्री ९.३० वाजता बेझनबाग, जरीपटक्यात ही घटना घडली. गोलू, कोटांगले आणि सहदाब अशी आरोपींची नावे आहेत. संजय संुदरलाल पारस्कर (वय ४३) असे जखमी दुकानदारांचे नाव आहे. त्यांच्यावर मेयोत उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले. त्यांचा शोध घेतला जात आहे.
---
महिलेचा पाठलाग करून अश्लील शिवीगाळ
नागपूर : आजारी मुलाचा उपचार करून घरी जात असलेल्या महिलेचा एकाने पाठलाग केला. त्याला हटकले असता त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली. गिट्टीखदान परिसरात ही घटना घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी खालिक शेख (रा. साईनगर) या आरोपीवर विनयभंग तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले.
----
विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
नागपूर : तरोडी येथील गंगानगरात राहणारे राजेंद्र धरमदास वर्मा (वय ४०) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी ही घटना उघडकीस आली. धरमदास कन्हैयालाल वर्मा (वय ६२) यांच्या तक्रारूवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. राजेंद्रच्या आत्महत्येचे कारण शोधले जात आहे.
---
वृद्धेने लावला गळफास
नागपूर : पाचपावलीतील नाईक तलाव परिसरात राहाणाऱ्या तुलसीबाई आनंदराव केळवदकर (वय ६५) यांनी बुधवारी दुपारी १ ते ३ च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली. राजू आनंदराव केळवदकर (वय ४०) यांच्या सूचनेवरून पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
------