लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाच
By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST
लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाच
लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाच
लोकशाही टिकून राहण्याचे श्रेय संविधानालाचमान्यवरांचे प्रतिपादन : संविधान सभा डिबेटस्चे लोकार्पणनागपूर : विविध जातीधर्माच्या नागरिकांना एकसंघ करून देशाची सुरक्षा आणि अखंडता निर्माण करण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळे आज लोकशाही टिकून असून याचे श्रेय बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानालाच जाते, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.वंदना संघ, राईट थिंकर्स पब्लिकेशन ॲण्ड डाक्युमेन्टेशन प्रा.लिच्या वतीने संविधान डिबेटस् या मराठी आवृत्तीच्या खंडाचे प्रकाशन वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. अध्यक्षस्थानी वासुदेव थूल होते. व्यासपीठावर देवीदास घोडेस्वार, भय्याजी खैरकर, प्राचार्य विठ्ठलराव खाडे, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक सचिन मून, विठ्ठलराव डांगरे, जमुना डगावकर उपस्थित होते. प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे म्हणाले, संविधान तयार करताना काय चर्चा झाली याची माहिती संविधान डिबेटस्मधून मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रासाठी मेहनत घेऊन संविधान आपल्यापुढे ठेवले. संविधान डिबेटस् मराठीतून लोकांपर्यंत पोहोचले ही महत्त्वाची बाब आहे. संविधानातून बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या नागरिकांना सन्मान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले. देवीदास घोडेस्वार यांनी देशात कुठेही समस्या निर्माण झाल्यास संविधानाची गरज पडत असल्याचे सांगितले. प्रा. अनिल काणेकर यांनी संविधान डिबेटस्चे मराठी भाषांतरामुळे ते सर्वसामान्यांपर्यंत जाणार असल्याचे सांगितले. भय्याजी खैरकर यांनी शासनाने परवानगी दिल्यास बाबासाहेबांचे अप्रकशित साहित्य प्रकाशित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. वासुदेवराव थूल यांनी सरकारचा पैसा न घेता आंबेडकरांचे साहित्य प्रकाशित करायचे हे वंदना संघाचे तत्त्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संविधान डिबेटस्साठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.