शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

भारतात iPhone ची निर्मिती, लवकरच ग्राहकांच्या हाती

By admin | Updated: May 18, 2017 16:27 IST

तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनचे भारतात प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू, दि. 18 - तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनचे भारतात प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल  "द एसई"ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूरू येथील प्रकल्पात ही चाचणी घेतल्याचं वृत्त आहे. त्यामुळे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भारतात अॅसेम्बल झालेला हा आयफोन ग्राहकांच्या हातात पडण्याची शक्यता आहे.

तैवानची विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. आयफोन एसई या मॉडेलच्या जोडणीचे काम बंगळुरु येथे सुरू झाले आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना देशात निर्मिलेल्या आयफोनचे मॉडेल वापरण्याचा आनंद घेता येणार आहे. 
 
हा फोन भारतात अॅसेम्बल झाल्याने त्याची किंमतही काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असली तरीही भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. सध्या काही भारतीय रिसेलर्सकडून या मॉडेलची 320 डॉलरला विक्री केली जाते. मात्र, कंपनीने या किंमतीपेक्षा किमान 100 डॉलरने स्वस्त असावी अशी इच्छा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.  मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे आयफोनची मागणी कमी झाल्याने अॅपलकडून हे विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे.