शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भाकप नेते दासगुप्ता यांचे निधन; शुक्रवारी अंत्यसंस्कार; पंतप्रधान, उपराष्ट्रपतींची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 04:11 IST

दासगुप्ता यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. कामगारांच्या प्रश्नांना संसदेत व संसदेबाहेर आपल्या घणाघाती वक्तृत्वाने वाचा फोडणारे नेते अशी गुरुदास दासगुप्ता यांची ख्याती होती.

कोलकाता : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह सर्व पक्षांंच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दासगुप्ता यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवारी कोलकाता येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दासगुप्ता यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. कामगारांच्या प्रश्नांना संसदेत व संसदेबाहेर आपल्या घणाघाती वक्तृत्वाने वाचा फोडणारे नेते अशी गुरुदास दासगुप्ता यांची ख्याती होती. ते १९८५ सालापासून पाच वेळा खासदार होते. दासगुप्ता १९५० व १९६० च्या दशकात विद्यार्थी चळवळीतून ते सक्रिय झाले. १९६४ साली भाकपमध्ये फूट पडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली, तेव्हा त्यांनी भाकपमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते सरचिटणीस होते. 

यूपीए-१मध्ये मोलाची भूमिका२००४ साली केंद्रात यूपीए-१ सरकार स्थापन करण्यात भाकपचे नेते ए. बी. बर्धन यांच्याबरोबर दासगुप्ता यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी २०१४ पासून लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दासगुप्ता विचारसरणीशी अत्यंत निष्ठावंत असलेले आदर्श नेते होते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.