शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

गाय मातेसमान

By admin | Updated: June 12, 2017 00:06 IST

कोणी स्वप्नातही गाईला इजा करू नये. गोहत्येइतके घोर अन्य कोणतेही पाप नसल्याने कोणी गामांस भक्षणाचा कधी विचारही मनात आणू नये

हैदराबाद : कोणी स्वप्नातही गाईला इजा करू नये. गोहत्येइतके घोर अन्य कोणतेही पाप नसल्याने कोणी गामांस भक्षणाचा कधी विचारही मनात आणू नये. गाय ही सर्व प्राणीमात्रांची जननी आहे. चरारचर सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या देवदेवतांची गाय ही माता आहे. गाय ही सर्व देवांची देवी आहे आणि ती पावित्र्याचे मूर्तिमंत प्रतिक आहे. गाईपेक्षा काही श्रेष्ठ नाही. गाय ही आनंदनिधान आहे. सर्व विश्वाचा गाय हाच मूलाधार आहे.हे गोमहात्म्य कोण्या कट्टर हिंदू धर्ममार्तंडाने किंवा अलीकडे मोकाट सुटलेल्या स्वयंभू गोरक्षकाने सांगितलेले नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. बी. शिवशंकर राव यांनी शुक्रवारी दिलेल्या एका निकालपत्रातील हा उतारा आहे.नलगोंडा येथील एका जनावरांच्या व्यापाऱ्याकडून कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या ६३ गायी आणि दोन बैल गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये जप्त करण्यात आले होते. ते आपल्याला परत मिळावेत यासाठी त्या व्यापाऱ्याने केलेली याचिका फेटाळताना न्या. राव यांनी गोमहात्म्य आळविणारे निकालपत्र दिले.सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत न्या. राव यांनी म्हटले की, बकरी ईदवेळीही कुर्बानीसाठी गाय मारण्याचा मुस्लिमांना मुलभूत हक्क नाही. कुर्बानी हा धर्माचरणाचा भाग असला तरी यासाठी गायच मारावी, असे इस्लाम कुठेही सांगत नाही.उपनिषदे, वेद आणि पुराणांचा हवाला देत हे निकालपत्र म्हणते की, या भारत देशात गाय ही मातेसमान व म्हणूनच देवासमान आहे अशी बहुसंख्य लोकांची श्रद्धा आहे. गाईला खास पावित्र्य असून तिला ‘अघन्य’ समजण्यात येते. म्हणूनच गाय ही पवित्र राष्ट्रीय संपत्ती आहे.न्या. राव लिहितात की, गाय ही मातेसमान आहे. कारण मातेचा पान्हा आटतो तेव्हा ही गायच निरलस भावनेने दूध देते व त्यावर आपले भरणपोषण होते. त्यामुळे ज्याने कधी गाईचे दूध प्राशन केले आहे अशी व्यक्ती मातेसमान गाईला मारून तिचे मांस भक्षण करण्याचे समर्थन कसे बरे करू शकेल? न्या. राव एवढेच लिहून थांबले नाहीत. आंध्र आणि तेंलंगण या दोन्ही राज्य सरकारांनी ‘प्रिव्हेन्शन आॅफ क्रुएल्टि टू अ‍ॅनिमल अ‍ॅक्ट’मध्ये तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९ मध्ये दुरुस्ती करून गोहत्या आणि गायींना निर्दयी वागणूक देणे हे अजामिनपात्र गुन्हे ठरवावेत, असा आदेशही दिला. यासाठी राज्यांना ७ जुलैपर्यंतची मुदत दिली. (वृत्तसंस्था)