शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

सेक्सलाईफ उघड करणारी आकांक्षा युवराजच्या भावाला खेचणार कोर्टात

By admin | Updated: May 31, 2017 13:32 IST

वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करणा-या आकांक्षा शर्माने आता झोरावर सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 -  बिग बॉस 10 मध्ये सहभागी होऊन आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करणा-या आकांक्षा शर्माने आता झोरावर सिंग विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. झोरावर सिंग युवराज सिंगचा भाऊ आहे. युवराजच्या घरात आपल्याला अमानवीय वागणूक दिली जायची असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. 
 
बॉलिवूडपापा डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार आकांक्षा झोरावर विरोधात खटला दाखल करण्याच्या तयारीत आहे. लग्न मोडण्यासाठी आकांक्षा शर्माने सासूबाई शबनम सिंग यांना जबाबदार धरले होते.  झोरावर आणि मी शारीरीक आणि मानसिक दृष्टया कधीही एकत्र येऊ शकलो नाही. आम्ही दोघे जेव्हा एकत्र बाहेर जायचो. तेव्हा सासूबाई नेहमी आमच्यासोबत असायच्या. हात पकडा, किस करा अशा त्या सूचना करायच्या. सांगून अशा गोष्टी होतात का ? हे नैसर्गिकपणे घडून आले पाहिजे असे आकांक्षाने मुलाखतीत म्हटले होते. 
आणखी वाचा 
 
झोरावरला आकांक्षा बरोबर सामंजस्याने अलग व्हायचे नाहीय. त्याला आकांक्षाला काहीही द्यायचे नाहीय अशी माहिती आकांक्षाच्या वकिलाने दिली. या प्रकरणात आर्थिक आणि भावनिक दोन्ही आधारांवर घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करता येऊ शकतो. घरात तीन स्वयंपाकी असतानाही आकांक्षा सकाळी पाच वाजता उठून चहा करायला सांगितला जायचा. तिला रोजच्या खर्चासाठी झोरावर किंवा त्याच्या कुटुंबाकडून एकही पैसा दिला जात नव्हता अशी माहिती आकांक्षाच्या वकिलाने दिली. 
 
गुरगाव येथे राहणा-या आकांक्षाचे काहीवर्षांपूर्वी झोरावरबरोबर लग्न झाले होते. दुर्देवाने त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि अवघ्या चार महिन्यात ते विभक्त झाले. बिगबॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर स्पॉटबॉय कॉमला दिलेल्या मुलाखतीत आकांक्षाने आमची सेक्सलाईफही खूप निराशाजनक होती असे सांगितले. त्याने माझ्यावर प्रेम केले पाहिजे. मला जवळ घेतले पाहिजे. "चल आपण सेक्स करु" असे मी सांगू शकत नाही. आम्ही एकाच बिछान्यावर दोघे झोपायचो पण आमच्यामध्ये उशी असायची. झोरावर खूप वाईट पद्धतीने घोरते त्यामुळे मी माझी झोपण्याची जागा बदलली असे आकांक्षाने सांगितले.