न्यायालय आवारात गोंधळ
By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST
न्यायालय आवारात गोंधळ
न्यायालय आवारात गोंधळ
न्यायालय आवारात गोंधळचौघांना अटकनागपूर : जिल्हा न्यायालय आवारात गोंधळ घालून शांतता भंग करणाऱ्या चार जणांना न्यायालय सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर पोलिसांच्या स्वाधीन केले. अतुल भाऊराव चापके रा. अमरज्योतीनगर जरीपटका, शुभम संतोष मेश्राम रा. भीमचौक, विपीन राजकुमार नेहलानी रा. हुडको कॉलनी आणि एडव्हिन पॉल अल्फान्स रा. सदर, अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दैनिक भास्कर हल्ला प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन पेशीसाठी कारागृहातून आणण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी हे आरोपी आले होते. हल्ला प्रकरणातील आरोपींना पाहताच या लोकांनी जोरजोराने आरडाओरड करीत गोंधळ घातला. त्याच वेळी त्यांना सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि अन्य लोकांना पिटाळून लावले.