शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

मुस्लीम तरुणीला हिंदू पतीसोबत राहण्यास कोर्टाची परवानगी

By admin | Updated: April 1, 2015 20:14 IST

एका हिंदू तरुणासोबत विवाह केल्याचा राग मनात धरुन मुस्लीम तरुणीला पालकांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप न करता त्यांना एकत्रित राहू द्यावे असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १ - एका हिंदू तरुणासोबत विवाह केल्याचा राग मनात धरुन मुस्लीम तरुणीला पालकांनी तिच्या आयुष्यात हस्तक्षेप न करता त्यांना एकत्रित राहू द्यावे असा महत्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.हिंदू तरुणासोबत विवाह केल्याने मुस्लीम समाजातील मुलीच्या पालकांकडून तिला धमकी दिली जात होती तसेच एकत्रित राहण्यास मज्जाव केला जात होता. न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. डिसेंबर २०१४ रोजी हे प्रकरण प्रथमच कोर्टात सुनावणीसाठी आले होते. त्यावेळी मुलीने कोर्टात सांगितले की, आपण स्वमर्जीने पती आकाशसोबत दिल्लीहून नोएडाला गेलो होतो. तसेच त्यानंतर आपल्या मर्जीनेच आई-वडिलांच्या घरी परतलो होतो. माझे आकाशसोबत लग्न झाले असून आकाशने आपल्या इच्छेविरुध्द कधीच आपल्याला घरात थांबवले नाही. असे असले तरी सध्या मला माझ्या आई-वडिलासोबत राहण्याची इच्छा असून तीन वर्षापर्यंत वैवाहिक जीवनापासून अलिप्त राहू इच्छिते. मुलीने केलेली मागणी न्यायालयाने मान्य करीत तिला तिच्या पालकांसोबत राहण्याची परवानगी दिली तसेच मुलीच्या पालकांना सक्त ताकीद दिली की, दरम्यानच्या काळात मुलीचे अन्य दुस-या कोणाबरोबर निकाह लावून देवू नका असे सांगितले. परंतू जानेवारी महिन्यात आकाशने कोर्टात याचिका दाखल करीत कोर्टाकडे दाद मागितली. आपल्या पत्नीचा आपल्याला फोन आला असून तिचे पालक तिचा निकाह अन्य दुस-या मुलासोबत लावून देण्याच्या प्रयत्नात असल्याने कोर्टाने याची दखल घ्यावी अशी विनंती केली. कोर्टाने पोलिस प्रशासनाला याचा तपास करण्यास सांगून मुलीला व पालकांना कोर्टासमोर उभे करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानूसार पोलिसांनी मुलीला व पालकांना कोर्टात उभे केले असता मुलीने सांगितले की, दुस-याशी लग्न करावे यासाठी पालकांकडून आपल्याला मारहाण करण्यात येत असून आता आपल्याला पती आकाशसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी न्यायालयाकडे मागणी केली. मुलीच्या मागणीचा विचार करीत न्यायालयाने मुस्लीम तरुणीला हिंदू पतीसोबत राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली.