शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आवाजाचे नमुने घेण्यास कोर्टाची परवानगी नाही

By admin | Updated: February 26, 2016 03:47 IST

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि पत्रकारांसह इतरांना मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडल्या गेलेल्या तीन वकिलांविरुद्ध अवमाननेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि पत्रकारांसह इतरांना मारहाण करताना कॅमेऱ्यात पकडल्या गेलेल्या तीन वकिलांविरुद्ध अवमाननेसंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी करण्याला सहमती दर्शविली आहे. दरम्यान दिल्ली न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेल्या उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या आवाजाचे नमुने घेण्यास पोलिसांना परवानगी नाकारलीआहे.वकिलांवर कारवाईबाबत तातडीने सुनावणी करण्याची विनंती वकील प्रशांत भूषण आणि कामिनी जयस्वाल यांनी केल्यानंतर शुक्रवारी संबंधित खंडपीठासमक्ष सुनावणी केली जाईल, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर आणि न्या. यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने स्पष्टकेले. पतियाळा न्यायालयातील १५ आणि १७ फेब्रुवारी रोजीच्या हिंसाचारप्रकरणी अन्य प्रलंबित याचिकेवर न्या. चेलामेश्वर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने १० मार्च रोजी सुनावणी निश्चित केल्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी करावी, असे भूषण यांनी म्हटले. विक्रमसिंग चौहान, यशपालसिंग आणि ओम शर्मा हे तीन वकील पत्रकारांना मारहाण करीत असल्याचे कॅमेऱ्यात दिसले. न्यायालयाने स्वत:हून अवमानना कारवाई करावी तसेच पत्रकारांवरील हल्ल्याबाबत तपास चमूकडून तपास करण्याची अशी विनंती या याचिकेत केली होती.रिमांडच्या काळात गोपनीयता...महानगर दंडाधिकारी लव्हलीन यांनी गुरुवारी उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य या दोघांच्या आवाजांचे नमुने घेण्यास परवानगी नाकारली.या दोघांनी २३ फेब्रुवारीच्या रात्री पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर बुधवारी रात्री तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.रिमांडच्या सुनावणीबाबत गोपनीयता बाळगण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्यानंतर दक्षिण कॅम्पस पोलीस ठाण्यात तात्पुरता न्यायालयीन कक्ष उभारण्यात आला आहे.