जोडबातमी... आग
By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST
(बॉक्स)
जोडबातमी... आग
(बॉक्स)घातपात शक्यआग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज होता; परंतु वीज खात्याने पाहणी केल्यावर ही आग शॉर्ट सर्किटची नसल्याचे खात्याच्या अधिकार्यांनी स्पष्ट केले. आगीचे कारण शोधून काढण्याची सूचना करणारे पत्र खात्याकडून पोलिसांना लिहिले होते. यामुळे बाजाराला लागलेली आग हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला आहे. (बॉक्स)(विष्णूचा फोटो सेव केला आहे)आता काहीच राहिलेले नाहीएखाद्या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या स्थानाचाच भूकंपात सर्वाधिक विध्वंस होतो, त्याप्रमाणे आगीची सर्वाधिक झळ बसली ती वाडे-ताळगाव येथील विष्णू आमोणकर यांना. त्यांचे दुकान १०० टक्के जळाले. देवपूजेसाठीच्या साहित्यापासून घरगुती वापराच्या अत्यंत किरकोळ वस्तूही त्यांच्या दुकानात होत्या. रविवारीच त्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले होते. त्यासाठी मोठे कर्जही घेतले होते. त्यांच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली. आगीची वार्ता ऐकून ते धावत आले; परंतु दुकान नष्ट झाले होते. भरल्या डोळ्यांनी ते हताशपणे पाहात राहिले. आता काहीच राहिलेले नाही, एवढेच ते बोलले.