शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणासाठी देश पूर्णपणे सज्ज- स्वराज यांची ग्वाही लोकसभेत मुद्दा : चीन-पाकिस्तान अणुकरारामुळे सरकार चिंतित

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतित असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानमधील अणुकरारामुळे सरकार चिंतित असून आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे, तथापि भारताने स्वत:चे हित जपण्यासाठी पूर्णपणे तयारी केलेली आहे. आम्ही पूर्णपणे सतर्क आहोत. धमक्या हाणून पाडण्याची पूर्ण तयारी आहे, देशाला कोणतीही झळ पोहोचणार नाही, अशी ग्वाही विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.
या दोन देशांमधील अणुकरारांमुळे देश सतर्क झाला असून चीनची संयुक्त राष्ट्रासारख्या जागतिक संघटनेकडे तक्रार करण्याजोगी कोणतीही परिस्थिती उद्भवलेली नाही. देशाचे सुरक्षाहित जपण्यासाठी सवार्ेपरी पावले उचलण्यास सरकार कटिबद्ध आहे. प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्यांनी पाकिस्तानकडून अणुहल्ला होण्याच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यासंबंधी पूरक प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या की, चीनने आतापर्यंत पाकिस्तानसोबत तीन अणुकरार केले असल्याची माहिती सरकारला आहे. या करारामुळे जागतिक नि:शस्त्रीकरणावर होणाऱ्या परिणामांबाबत सरकारची चिंता कायम आहे. अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणाबाबत या देशांनी कराराचे पालन करावे असे सरकारला वाटते.
-----------------------
तिसरा करार...
चीन आणि पाकिस्तानने १९८६ मध्ये पहिला अणुकरार केला तेव्हा चश्मा एक आणि चश्मा दोन अणुभट्ट्या लावण्याचा मुद्दा समाविष्ट होता. २००१ मध्ये झालेल्या दुसऱ्या चश्मा तीन आणि चश्मा चार अणुभट्ट्या लावण्यासंबंधी करार झाला होता. आता आणखी अणुकरार झाल्याची माहिती मिळाली आहे. आम्ही हा मुद्दा चीनकडे उपस्थित केला आहे. हा करार आंतरराष्ट्रीय उत्तरदायित्वाला अनुसरून आहे. या कराराचा अवलंब केवळ शांततापूर्ण कार्यासाठी केला जात आहे, असा खुलासा चीनने केल्याची माहिती स्वराज यांनी दिली.