शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशात २0 कोटी लोक उपाशी अन् ७.८0 लाख क्विंटल धान्य सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 05:28 IST

दरवर्षी धान्याची नासाडी : माहिती अधिकारातून झाले उघड

नवी दिल्ली : भारतात किमान २0 कोटी लोकांना अन्नावाचून एक तर उपाशी राहावे लागते अथवा अर्धपोटी भोजनावर दिवस काढावा लागतो. देशात दरडोई सरासरी ५00 ग्रॅम अन्नाची गरज आहे. पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे रोज ८२१ बालकांचा मृत्यू होतो.

हे विदारक चित्र एकीकडे आहे तर सरकारी बेपर्वाईमुळे गेल्या १0 वर्षांत गोदामांमधील ७.८0 लाख क्विंटल धान्य सडून वाया गेल्याचे उघड झाले आहे. याचाच अर्थ असा की रोज सरासरी ४३ हजार लोकांच्या वाट्याचे अन्न सडल्यामुळे वाया गेले. माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जाद्वारे हे सत्य समोर आले आहे.

खाद्यान्न विशेषज्ञांच्या मते मुख्यत्वे पावसात भिजल्यामुळे दहा वर्षांत सरकारी अथवा गैरसरकारी गोदामांमधील धान्य सडून गेले. उपलब्ध आकडेवारीनुसार यूपीए सरकारच्या ६ वर्षांच्या कालखंडात ४.४२ लाख क्विंटल धान्य सडले, तर मोदी सरकारच्या चार वर्षांच्या काळात ३.३८ लाख क्विंटल धान्य सडल्याची माहिती आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान म्हणतात की, ४ वर्षांत धान्य खराब होण्याचे प्रमाण घटले, याचे कारण धान्य सडू नये, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सरकारने केल्या आहेत. यंदा किती नासाडीभारतात साधारणत: २३७.४0 कोटी क्विंटल धान्योत्पादन प्रतिवर्षी होते. त्यातील सरासरी १२.६४ कोटी क्विंटल धान्य शेतातून गोदामात पोहोचेपर्यंत खराब होऊन जाते. यंदा सप्टेंबरपर्यंत ४६४0 क्विंटल धान्य खराब झाल्याची माहिती मिळाली आहे.पश्चिम बंगालमध्ये सडले सर्वाधिक अन्नधान्यराज्य            सडलेले अन्नधान्यप. बंगाल     १ लाख ५४ हजार ८१0 क्विंटलबिहार          ८२ हजार १0 क्विंटलपंजाब          ३२ हजार ८00 क्विंटलउत्तर प्रदेश    २४ हजार ४९0 क्विंटलउत्तराखंड      ३४ हजार ५८0 क्विंटलझारखंड      ७ हजार ८९0 क्विंटलदिल्ली         १३७0 क्विंटल

टॅग्स :foodअन्न