शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

संसदेत राष्ट्रपतिपदासाठी मतमोजणीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 11:15 IST

संसदेमध्ये राष्ट्रपती पदासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20- संसदेमध्ये राष्ट्रपती पदासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होणार आहेत.
सर्वात आधी संसद भवनातील बॅलेट बॉक्स उघडला जाईल आणि त्यानंतर सर्व 31 राज्यांचे बॅलेट बॉक्स उघडले जातील. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार बॅलेट बॉक्स उघडून, मतांची मोजणी केली जाईल. एकूण आठ टप्प्यात मतमोजणी होईल. यानंतर निवडणूक आयोगाचे रिटर्निंग ऑफिसर निकालाची अधिकृत घोषणा करतील. 
 
एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीराकुमार यांच्यात सरळ लढत आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण असतील हे जाहीर होईल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे. त्यापूर्वी 20 जुलै रोजीच नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे नाव जाहीर होईल. एनडीएकडे तब्बल 63 टक्के मतांचे पाठबळ असल्याने रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर भाजपा नेत्यांनी तसा दावाच केला आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य 10,98,882 असून, विजयासाठी 5,49,442 आवश्यक आहे. देशाच्या संसद भवनात आणि 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी  संसद भवनात सोमवारी 99 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. 
 
रामनाथ कोविंद यांचा विजय का निश्चित मानला जातोय?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मतदानाच्या 50 टक्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. एनडीएकडे स्वत:ची 48 टक्के मते आहेत. याखेरीज 6 विरोधी पक्षांसह ज्या 16 पक्षांनी एनडीए उमेदवार कोविंद यांना पाठिंबा दिला, त्यांच्या मतांचे प्रमाण 15 टक्के आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना किमान 63 टक्के मते निश्चितच मिळू शकतील. कदाचित त्याहून अधिक मतेही ते मिळवू शकतील. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
 
31 राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान...
- राष्ट्रपती निवडण्यासाठी देशाच्या 31 राज्यांच्या विधान भवनांमध्येही मतदान झाले. मिळालेल्या माहितीनुसार त्रिपुरा, उत्तर प्रदेश व गुजराथमधे क्रॉस व्होटिंग झाले. त्रिपुरात पक्षाचा आदेश झुगारून तृणमूलच्या 6 व काँग्रेसच्या 1 बंडखोराने रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे समजते.
उत्तर प्रदेशात मुलायमसिंगांचे बंधू शिवपाल यादव यांच्या दाव्यानुसार समाजवादी पक्षातल्या सुमारे 10 आमदारांनी कोविंद यांना मतदान केले, गुजराथमधे भाजपचे बंडखोर आमदार नलिन कोटडिया यांनी मीरा कुमारांना मतदान केल्याचे कळते. राजस्थानात तीन तास आधीच मतदान पूर्ण झाले. महाराष्ट्रात 2 तर झारखंडात 4 आमदारांना तुरुंगातून मतदानासाठी आणले गेले.
 
खासदारांसाठी हिरव्या तर आमदारांसाठी गुलाबी मतपत्रिका...
- संसद भवनातील केंद्रावर मतदान करणाऱ्यांमधे प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती आदींचा समावेश होता. खासदार अभिनेता परेश रावल व हेमामालिनी यांनीही संसद भवनात मतदान केले. मतदान केंद्रावर खासदारांसाठी हिरव्या रंगाच्या तर आमदारांसाठी गुलाबी रंगाच्या मतपत्रिका होत्या.