शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मपरीक्षण करून चुका सुधारू - केजरीवाल

By admin | Updated: April 30, 2017 00:50 IST

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी

नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी चुकांची कबुली दिली. आम्ही चुकलो आहोत; पण पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही आत्मपरीक्षण करून चुका दुरुस्त करू, असे त्यांनी म्हटले आहे.दिल्ली महानगरपालिकेतील आपच्या पराभवास मतदान यंत्रांतील घोळ जबाबदार असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता; मात्र आपचे दुसरे नेते कुमार विश्वास यांनीच त्यांच्या या वक्तव्यास विरोध केला होता. पक्षाच्या कार्यपद्धतीवरही विश्वास यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी ट्विट करून चुकांची कबुली दिली. अशा प्रकारे चुकांची कबुली देणे ही भारतीय राजकारणात दुर्मिळ बाब समजली जात आहे.केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बोललो आहे. सत्य परखड आहे. होय, आम्ही चुका केल्या आहेत; मात्र आम्ही आत्मपरीक्षण करून चुकांची दुरुस्ती करू. बदल न करणे मूर्खपणाचे ठरेल.’केजरीवाल यांनी म्हटले की, ‘आम्ही मतदार आणि कार्यकर्त्यांचे देणे लागतो. आम्ही स्वत:चेही देणे लागतो. आता सबबी सांगणे नव्हे, तर कृती करणे गरजेचे आहे. कामावर परतण्याची ही वेळ आहे. आम्ही वेळोवेळी घसरत असलो तरी पकड शोधून स्वत:ला वर उठविणे महत्त्वाचे आहे. लोक उणिवांसाठी अजिबात पात्र नाहीत. बदल हीच कायम टिकणारी गोष्ट आहे.’पंजाब आणि गोव्यातील पराभवानंतर आपल्या अंगणात म्हणजेच दिल्लीतच आपला पराभवाचा सामना करावा लागला होता. दोनच वर्षांपूर्वी आपने दिल्ली विधानसभा प्रचंड बहुमताने जिंकली होती; पण आता आपच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून येत आहे.