शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित/ कुत्रा फाशी संघ नेत्याच्या स्मृतिदिनी तीन कुत्र्यांना दिली फाशी केरळमध्ये सूडाचे प्रदर्शन : विजेच्या खांबावर लटकवून व्यक्त केला रोष

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्‘ातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मो˜ा गावाजवळ काही समाजकंटकांनी कारवर बॉम्ब फेकल्यानंतर ती विजेच्या खांबावर आदळून मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याच विजेच्या खांबाला कुत्र्यांचे मृतदेह लटकविलेलेे आढळून आले.

कन्नूर : केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पूर्व कथीरूर भागात रा.स्व. संघाचे नेते ई. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनी मंगळवारी गळे कापलेल्या तीन कुत्र्यांचे शव विजेच्या खांबाला लटकवलेले आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी १ सप्टेंबर रोजी उक्कास मोट्टा गावाजवळ काही समाजकंटकांनी कारवर बॉम्ब फेकल्यानंतर ती विजेच्या खांबावर आदळून मनोज यांचा मृत्यू झाला. मनोज यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रार्थनेसाठी जात असलेल्या कार्यकर्त्यांना त्याच विजेच्या खांबाला कुत्र्यांचे मृतदेह लटकविलेलेे आढळून आले.
तणाव टाळण्यासाठी या कार्यकर्त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. या कृत्यामागे माकप असल्याचा आरोप भाजप-रा. स्व. संघाच्या नेतृत्वाने केला आहे. संघ परिवारात मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत असल्यामुळे धास्तावलेल्या माकपने अशांतता निर्माण करण्यासाठी कारवाया चालविल्या असल्याचे संघाचे विभाग कार्यवाहक व्ही. शशीधरन यांनी म्हटले.
-------------------------
सूडबुद्धी कायम
दरम्यान तपासाचा भाग म्हणून कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून कथीरूर पोलिसांनी तपास चालविला असल्याचे सूत्रांनी नमूद केले. अलीकडे कन्नूर येथे माकप आणि भाजप समर्थकांमध्ये हिंसक संघर्षाची मालिकाच पार पडली आहे. मनोज हे रा. स्व. संघाचे कन्नूर जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख होते. १९९९ मध्ये माकपचे नेते पी. जयराजन यांच्यावर जीवघेण्या हल्ल्यात त्यांना आरोपी बनविण्यात आले होते. मनोज यांच्या हत्येचा तपास सोपविण्यात आलेल्या सीबीआयने यापूर्वीच जयराजन यांची चौकशी केली आहे. सूडाच्या राजकारणातून मनोज यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने चालविला आहे.
----------------------
कोट
समाजकंटकांनी मनोज यांच्या कारवर बॉम्ब फेकून तालिबानी पद्धतीने हत्या घडविली होती. या घटनेला वर्ष उलटले असतानाही माकपने सूडबुद्धी कायम ठेवत प्रदर्शन चालविले आहे.
-के. रणजित, भाजपचे जिल्हाध्यक्ष.