नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप नको...
By admin | Updated: October 28, 2015 22:39 IST
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात ढवळाढवळ करणार्या नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच पुढील स्थायी समिती सभा व महासभेलाही सन्मानीय सदस्य, अधिकारी व पत्रकारांशिवाय सभेला कोणालाही बसू दिले जाणार नाही.
नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप नको...
जळगाव : महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात ढवळाढवळ करणार्या नगरसेविकांच्या पतींनी प्रशासकीय कामात हस्तक्षेप करू नये, असे उपमहापौर सुनील महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. तसेच पुढील स्थायी समिती सभा व महासभेलाही सन्मानीय सदस्य, अधिकारी व पत्रकारांशिवाय सभेला कोणालाही बसू दिले जाणार नाही. महासभा असो की स्थायी सभा. नगरसेविकांचे पती किंवा निकटवर्तीय भर सभेत येऊन बसतात. प्रशासकीय कामात हस्तक्षेप करतात. प्रसंगी अधिकार्यांवर दबावतंत्र टाकण्याचे प्रकार वारंवार निदर्शनास येत आहे. त्यामुळे महासभा व स्थायी समिती सभेला कोणी येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.