शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

CoronaVirus : 'आम्हाला तुमचा अभिमान आहे', पाकच्या एटीसीकडून एअर इंडियाचे कौतुक!   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 08:53 IST

CoronaVirus : एअर इंडियाच्या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे.

नवी दिल्ली : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात सुद्धा कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, या संकटाच्या परिस्थितीत सुद्धा काही लोक आणि संस्था सुद्धा मोठी मदत करत आहे. यामध्ये एअर इंडियाचा सुद्धा समावेश आहे. 

एअर इंडियाने कोरोनासारख्या संकटाच्या काळात लोकांना सुखरूप पोहोचविण्यासाठी सतत उड्डाणे केली आहेत. एअर इंडियाच्या या कामगिरीला पाकिस्तानने सुद्धा सलाम केला आहे. पाकिस्तानचे एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) यांनी संकटाच्या काळात लोकांची मदत केल्याप्रकरणी एअर इंडियाचे कौतुक केले आहे.

लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या युरोपीयन नागरिकांना एअर इंडियाच्या विमानाने फ्रँकफर्टला सुखरूप पोहोचविले. यासंबंधीची माहिती एअर इंडियाच्या एका वरिष्ठ कॅप्टनने दिली. यावेळी ते म्हणाले, "जसे की आम्ही पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेलो, त्यावेळी एअर ट्रॅफिफ कंट्रोलरने आमचे स्वागत केले. कंट्रोलरने म्हटले की, मदत पुरवठा करणार्‍या एअर इंडियाच्या विमानाचे स्वागत आहे."

या उड्डाणावेळी पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने एअर इंडियाच्या पायलटला विचारले, 'कन्फर्म करा, आपण मदत सामग्रीसह फ्रँकफर्टला जात आहात?' त्यानंतर भारतीय पायलटकडून 'होय' असे उत्तर दिले. यानंतर पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने भारतीय विमानांना पुढील आवश्यक सूचना दिल्या. याचबरोबर, अखेरीस पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरने एअर इंडियाचे कौतुक करत म्हटले आहे की, 'आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारची साथीची घटना घडली तरी तुमचे विमान उड्डाण करत आहे. शुभेच्छा! त्यानंतर भारतीय पायलटने कौतुक केल्याबद्दल पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरचे आभार मानले.

दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही ३ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडियाPakistanपाकिस्तान