शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचे मृत्यू; मध्य प्रदेशात लपवालपवी?, भोपाळमध्ये होणारे अंत्यविधी आणि राज्याने दिलेल्या मृतांच्या संख्येत तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 06:43 IST

CoronaVirus News: भोपाळच्या एकट्या भदभदा स्मशानभूमीत सोमवारी कोरोनाने मरण पावलेल्यांचे एकूण ३७ मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. परंतु त्या दिवशी राज्यात एकूण ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लक्षणीय आहेत. कोरोनाने मरण पावलेल्यांवर दहन आणि दफनविधी करण्यासाठी अंत्यसंस्कार करण्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. अशातच राज्य सरकारकडून दिली जाणारी कोरोना मृतांची आकडेवारी आणि भोपाळमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या या रोगाने मरण पावलेल्यांच्या मृतदेहांची संख्या यात तफावत दिसून येत आहे. यामुळे सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत लपवालपवी करीत आहे, अशी शंका निर्माण झाली आहे.भोपाळच्या एकट्या भदभदा स्मशानभूमीत सोमवारी कोरोनाने मरण पावलेल्यांचे एकूण ३७ मृतदेह अंत्यविधीसाठी आले होते. परंतु त्या दिवशी राज्यात एकूण ३७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारने दिली. मागील पाच दिवसांची आकडेवारी पाहता ही तफावत प्रकर्षाने समोर येते. (वृत्तसंस्था)

अंत्यविधीसाठी लाकूडफाट्याची चणचण- भोपाळमधील अंत्यविधी केंद्रांवर काम करणारे कर्मचारी सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. अंत्यविधीसाठी सतत मृतदेह येत असल्याने त्यांना जेवण घेण्यासही वेळ मिळत नाही. - काही ठिकाणी अंत्यविधीसाठी पुरेसा लाकूडफाटा नसल्याने समस्या निर्माण झाल्या आहेत. - भोपाळमधील एका स्मशानभूमीचे कर्मचारी रईस खान म्हणाले की, आम्हाला सध्या आठवड्याला १०० ते १५० क्विंटल लाकूड लागत आहे. मागील आठवड्यात दररोज ४० ते ४५ मृतदेह येऊ लागल्याने हा लाकूडफाटा आम्हाला कमी पडू लागला आहे. 

- कोरोनाने मरण पावलेल्यांची आकडेवारी कमी दाखवत असल्याचा आरोप सरकारने खोडून काढला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विश्वास सारंग म्हणाले की, कोरोनामुळे होत असलेले मृत्यू लपविण्याचा सरकारचा अजिबात हेतू नाही. असे केल्याने आम्हाला कुणी पुरस्कार देणार नाही. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या