शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसींवरून कंपन्यांची अप्रत्यक्ष स्पर्धा?; सीरमच्या पुनावालांच्या 'त्या' ट्विटनंतर चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 17:25 IST

चांगल्या लसींच्या निकषांवर अदार पुनावालांचं ट्विटमधून भाष्य

पुणे : सध्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने विविध लसी विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अ‍ॅस्ट्राजेनिका, मॉर्डना आणि फायझर या कंपन्यांच्या लसींच्या मानवी चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. कोणती लस सर्वात आधी उपलब्ध होणार, याची उत्सुकता असतानाच आता लसीकरणाबाबत अप्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. मॉर्डना आणि फायझर या कंपन्यांनी लसीच्या परिणामकारकतेचे अंदाज नुकतेच जाहीर केले आहेत. यानंतर अदार पुनावाला यांनी चांगल्या लसीच्या निकषांबाबत केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरले आहे. 

सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पुनावाला यांनी म्हटले आहे की, सुरक्षितता, संबंधित आजारापासून दीर्घकाळ संरक्षण, वाहतूक आणि योग्य तापमानात साठवणूक करण्याची क्षमता, संपूर्ण मानवजातीला परवडेल अशा दरात उपलब्धता हे चार चांगल्या लसीचे निकष आहेत. चांगल्या लसीचे चार महत्वाचे निकष कोणते याबाबत त्यांनी ट्विटरवर भाष्य केल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट अ‍ॅस्ट्राझेनिका कंपनीसह कोव्हिशिल्ड लसीवर काम करत आहे. दुसरीकडे, जर्मन कंपनी बायोनटेक आणि अमेरिकन कंपनी फायझर संयुक्तरित्या लसीवर काम करत आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांनंतर लस ९० टक्के परिणामकारक असल्याचे चार दिवसांपूर्वी जाहीर केले. मॉर्डना कंपनीनेही त्यांची लस ९४.५ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले आहे. या लसी सध्या नियामक मंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. यापैकी एकाही लसीला अजून पूर्णपणे व्यापक प्रमाणात वापरण्याची मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे मान्यतेच्या सर्व कसोट्या पार करुन कोणती लस सर्वप्रथम जास्तीत जास्त प्रमाणात आणि परवडणा-या दरात उपलब्ध होईल, याबाबत वैद्यकीय क्षेत्रासह सर्वांनाच उत्सुकता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या